Latest

संभाजीराजेंची तब्येत खालावली ; मराठा समन्वक वर्षा बंगल्याकडे रवाना

अविनाश सुतार

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : मराठा समाजाच्या प्रमुख मागण्यांसाठी खासदार संभाजीराजे  छत्रपती मुंबई येथील आझाद मैदानावर उपोषणास बसले आहेत. आज तिसऱ्या दिवशी संभाजीराजेंची तब्बेत खालावली आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत. तोपर्यत उपचारही घेणार नाही, यावर संभाजीराजे ठाम आहेत. दरम्यान, दोन विद्यार्थी व १८ समन्वयक चर्चेसाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वर्षा बंगल्याकडे रवाना झाले आहेत.

संभाजीराजे यांचा आझाद मैदानावरील उपोषणाचा तिसरा दिवस आहे. आज त्‍यांची तब्बेत ढासळत निघाली आहे. रविवारी गृहमंत्री दिलीप वळसे – पाटील यांनी संभाजेराजेंची भेट घेतली होती चर्चेतून मार्ग काढण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते . शासनाने दिलेल्या चर्चेच्या आमंत्रणावरुन आज (दि. २८) ११ वाजता राज्यातील १८ समन्वयक आणि दोन विद्यार्थी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासह अन्य मंत्र्यांसोबत चर्चेसाठी गेले आहे. त्यामुळे आज चर्चेतून मार्ग निघण्याची शक्यता व्‍यक्‍त हाेत आहे.

हेही वाचलंत का ?  

SCROLL FOR NEXT