राज्यपाल कोश्यारी यांच्याविरोधात सोलापुरात शिवसेनेचे आंदोलन

राज्यपाल कोश्यारी यांच्याविरोधात सोलापुरात शिवसेनेचे आंदोलन
Published on
Updated on

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणार्‍या महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याविरोधात संपूर्ण महाराष्ट्रात संतापाचे वातावरण पसरले आहे. याच पार्श्वभूमीवर सोलापुरात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौकात त्यांचा निषेध करण्यात आला. यावेळी कोश्यारी यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

पुरुषोत्तम बरडे व पोलीस निरीक्षक उदय पाटील यांच्यात आंदोलनादरम्यान तणाव निर्माण झाला. यावेळी वातावरण चिघळले होते, पोलिसांनी शिवसैनिकांनी आणलेले बॅनर जप्त केले आहे. यानंतर पोलिसांच्या निषेधार्थ शिवसैनिक छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात आंदोलनाला बसले. 'जोपर्यंत बॅनर आम्हला मिळत नाही, तोपर्यंत आम्ही येथून उठणार नाही' अशी भूमिका शिवसैनिकांनी घेतली. पोलीस निरीक्षक उदय पाटील यांनी हात जोडून विनंती केली. मात्र, कोणीही ऐकले नाही.

या आंदोलनात शहरप्रमुख गुरुशांत धुत्तरगावकर, नगरसेवक भारत बडूरवाले, लहू गायकवाड, भीमाशंकर म्हेत्रे, विष्णू कारमपुरी महेश धाराशिवकर, जिल्हा परिषद सदस्य अमर पाटील, नगरसेवक विनोद गायकवाड, प्रताप चव्हाण, विजय पुकाळे, यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले आहेत.

यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करणे हे राज्यपाल कोश्यारी यांना शोभत नाही. वास्तविक छत्रपतींच्या गुरु या राजमाता जिजाऊ असल्याचे न्यायालयात सिध्द झाले आहे. त्यामुळे राज्यपाल हे सूडभावनेने कारभार चालवित आहेत. त्यामुळे कोश्यारी यांना त्वरीत पायउतार करावे तसेच कोश्यारी यांनी रायगडावर जाऊन छत्रपतींच्या पुतळ्यासमोर माफी मागावी असे म्हणाले.

दरम्यान, जोपर्यंत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे माफी मागणार नाहीत तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही आहे अशी भूमिका शिवसैनिकांनी घेतल्याने पोलिसांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. राज्यपाल कोश्यारी यांच्याविरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी केली. यानंतर आंदोलनकर्त्यांना फौजदार चावडी पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात नेले. याठिकाणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news