Latest

Samantha : ज्या घरात नागा-सामंथाने संसार केला, तेच घर घेतलं विकत

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू तिच्या करिअरमध्ये एकापेक्षा एक चित्रपट मिळवून यशाचे शिखर गाठत आहे. अभिनेत्री सामंथा अनेकदा चर्चेत येत असते. (Samantha) सामंथा तिची हिट गाणी, चित्रपट आणि नुकत्याच झालेल्या घटस्फोटामुळेही चर्चेत आहे. सामंथा या वर्षातील एक स्टँडआउट आहे, जिने पुष्पा मधील तिच्या 'ओ अंटावा' गाण्याने प्रेक्षकांची मनेही जिंकली होती. सामंथा केवळ तिच्या प्रतिभेमुळेच नव्हे तर तिच्या स्वतंत्र आणि साहसी व्यक्तिमत्त्वामुळे सर्वात आवडती नायिका झालीय. अभिनेत्रीने नुकतेच एक आलिशान घर घेतले आहे, ज्यासोबत तिच्या अनेक आठवणी जोडल्या गेल्या आहेत. (Samantha)

सामंथाचे नवीन घर

अभिनेत्रीने (सामंथा रुथ प्रभू) हैहराबादमध्ये घेतलेले घर अनेक अर्थाने खास आहे. सामंथा तिचा एक्स माजी पती नागा चैतन्यसोबत राहत असलेल्या घराच्या मालकाने अलीकडेच उघड केले की जोडप्याने वेगळे झाल्यानंतर घर विकले गेले. पण, त्यानंतर अभिनेत्रीने मालकांशी बोलून ते घर स्वतः विकत घेतलं. सध्या ती तिच्या आईसोबत तिथे राहतेय.

सामंथाची प्रेरणादायी कथा

करिअरमध्ये पदार्पण केल्यापासून अभिनेत्रीने खूप उंची गाठली आहे. करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या चॅट शोमध्ये दाखवल्याप्रमाणे, अभिनय हा सामंथाच्या करिअर नियोजनाचा भाग नव्हता. पण असे काही घडले जे घरी पैसे नसल्यामुळे तिला आपले शिक्षण पूर्ण करता आले. त्यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. स्वत:साठी घर विकत घेणे आणि स्वतंत्र स्त्री म्हणून उभे राहणे समंथाला अधिक सुंदर बनवते.

सामंथा चित्रपट

जर आपण सामंथाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले, तर तिचे आगामी चित्रपट म्हणजे 'शाकुंतलम', 'कुशी' आणि 'यशोदा', यामध्ये ती बिझी आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT