Latest

दीड महिन्यांनी सलमानला आली कॅटरिनाची आठवण ! बिग बॉसच्या ग्रँड फिनालेमध्येच म्हणाला..

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन : बिग बॉसच्या १५ व्या सिझनची (Bigg Boss 15 Finale ) विजेती तेजस्वी प्रकाश ठरली. शोच्या फिनालेमध्ये तेजस्वी प्रकाश आणि प्रतीक या दोघांमध्ये स्पर्धा होती. त्यामुळे कोण बिग बॉसच्या १५ चा विजेता? होणार याकडे सर्वांची उत्सूकता लागली होती. याच दरम्यान शोच्या फिनालेमध्ये बॉलिवूड अभिनेता सलमान खानने अभिनेत्री कॅटरिना कॅफची आठवण काढल्याने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे.

बॉलिलूड अभिनेत्री रुबीना दिलैक आणि अभिनेत्री राखी सावंतने ग्रॅड शोच्या फिनालेमध्ये (Bigg Boss 15 Finale ) कॅटरिना कैफच्या 'चिकनी चमेली' या गाण्यावर धमाकेदार डान्स केला. 'चिकनी चमेली' हे गाणे ऐकल्यानंतर सलमानला कॅटरिनाची आठवण झाली. यावेळी रुबीना आणि राखीच्या धमाकेदार डान्स संपताच सलमानने कॅटरिनाला तिच्या लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अभिनेता विक्की कौशल आणि कॅटरिनाचे लग्न होवून जवळपास दीड महिना उलटला आहे. गेल्या दीड महिन्यात सलमानने सोशल मीडियावर तिला शुभेच्छा दिल्या नव्हत्या. यामुळे चाहते आश्चर्य व्यक्त करत आहेत. याशिवाय सलमान खान आणि अर्पिता खान कॅटरिनाचा खूप चांगले मित्र आहेत. कामात व्यस्त असल्यामुळे सलमान खान कॅटरिनाच्या लग्नाला पोहोचू शकला नसल्याचे वृत्त समोर आले होते.

बिग बॉसच्या १५ व्या सिझनची विजेती तेजस्वी प्रकाश

निशांत भट्ट आणि शमिता शेट्टी हे बिग बॉस १५ च्या घरातून बाहेर पडले. निशांत भट्टला १० लाख रुपयांच्या ब्रीफकेससह तर शमिता शेट्टीही गेममधून बाद झाल्याने त्यांना बाहेर पडावे लागले. यानंतर ग्रॅड फिनालेच्या अंतिम फेरीत करण कुंद्रा, प्रतीक सेहजपाल आणि तेजस्वी प्रकाश हे तिघेजण शिल्लक राहिले. या तिघांपैकी कोण बिग बॉसची ट्रॉफी जिंकणार याकडे लक्ष लागले होते. याच दरम्यान अंतिम विजेती तेजस्वी प्रकाश ठरली.

हेही वाचलंत का? 

SCROLL FOR NEXT