Latest

Salman Khan : चाहत्‍यांनी चित्रपटगृहातच फटाके फोडले, सलमान म्‍हणाला…

नंदू लटके

मुंबई : पुढारी ऑनलाईन

अभिनेता सलमान खानच्‍या ( Salman Khan) 'अंतिम : द फायनल'ट्रूथ याच्‍या रिलीजवेळी चाहत्‍यांनी चित्रपटगृहात फटाके फोडले. हा व्‍हिडिओ सलमान खान याने इंस्‍टाग्रामवर शेअर करत या घटनेवर आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे.

चित्रपटगृहात फटाके फोडण्‍यावर सलमान खानने तीव्र नाराजी व्‍यक्‍त केली आहे. अशा कृत्‍याचे गंभीर परिणाम होवू शकतात. आगीची मोठी दुर्घटना घडू शकते. यामुळे तुमच्‍यासह दुसर्‍यांच्‍या जीव धोक्‍यात येवू शकतो. चाहत्‍यांनी चित्रपगृहात फटाके फोडू नयेत, अशी विनंती सलमानने ( Salman Khan) केली आहे.

चित्रपटगृह मालकांनीही प्रेक्षकांना चित्रपटृहात फटाके नेण्‍यास मज्‍जाव करावा. फटाके घेवून जाणार्‍यांना सुरक्षा रक्षकांनी रोखावे. चित्रपटाचा आनंद घ्‍या;पण फटाके फोडू नका, अशी चाहत्‍यांना माझी विनंती आहे, असेही त्‍याने म्‍हटलं आहे.

हेही वाचलं का?

SCROLL FOR NEXT