Latest

Sai Tamhankar : ही तर Caramel pudding! सईचा मदमस्त शॉर्ट ब्राऊन ड्रेस

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठी अभिनेत्री सई ताम्हणकरने (Sai Tamhankar) शॉर्ट ब्राऊन कलर ड्रेसमध्ये नवे फोटोशूट केलंय. नव्या फोटोशूटमध्ये सईचा ड्रेस चॉकलेट कॅरॅमलसारखा दिसणारा आहे. तिने एकापेक्षा एक फोटोज इन्स्टाग्रामला शेअर केले आहेत. तिने एका फोटोला हार्ट इमोजी शेअर केलाय. दुसऱ्या फोटोंना Chocolate Fantasy! ? अशी कॅप्शन लिहिलीय. आणि खास म्हणजे Caramel Chocolate pudding ! अशी कॅप्शन देत स्वत: ला 'कॅरॅमल चॉकलेट पुडिंग' म्हटलं आहे.

सईची विशेष गोष्ट म्हणजे, तिने आपले वजन खूप कमी केले असून आकर्षक फिगरसाठी ती मेहनत घेतेय. साडी असो वा जीन्स अथवा वेस्टर्न कपड्यांमध्ये तिचा लूक अप्रतिम दिसतो.

अनेक मराठी चित्रपटांसोबतच तिने बॉलिवूडमध्येही काम केलं आहे. मिमी या हिंदी चित्रपटातही ती दिसली. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे खूप कौतुक झाले. अनेक वेब सीरीजमध्येही ती दिसली होती. तिच्या झोळीत आता आणखी एक चित्रपट आहे-त्या चित्रपटाचे नाव आहे-ग्राऊंड झिरो.

या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता इम्रान हाशमी मुख्य भूमिकेत असेल तर सई (Sai Tamhankar) त्याच्या पत्नीच्या भूमिकेत दिसेल. इम्रान हाशमी एका लष्करी अधिकाऱ्याच्या भूमिकेत असेल. त्याचसोबत इंडिया लॉकडाऊन चित्रपटातही ती दिसेल. मधुर भांडारकर यांचा हा चित्रपट आहे.

हेदेखील वाचा –

SCROLL FOR NEXT