Latest

Russia Ukraine War : रशियन मेजर जनरल युद्धात ठार, युक्रेनचा दावा

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : रशिया आणि युक्रेन (Russia Ukraine War) यांच्यादरम्यान सुरू असणाऱ्या युद्धाचा आजचा 13 वा दिवस आहे. दरम्यान युक्रेनियन सशस्त्र दलाचे कमांडर व्हॅलेरी झालुझनी यांनी दिलेल्या माहितीनुसार, युक्रेनच्या हवाई संरक्षण दलाने कीव्ह जवळ रशियन विमान पाडले. एवढेच नाही तर रशियाच्या मेजर जनरल विटाली गेरासिमोव्ह यांना खार्किव्ह जवळ गोळ्या घालून ठार केले.

कीव्ह इंडिपेंडंटच्या एका ट्विटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, "युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाच्या मुख्य गुप्तचर विभागाने सांगितले की, युक्रेनने खार्किव्ह जवळ रशियन मेजर जनरल विटाली गेरासिमोव्ह यांची हत्या केली आहे." गेरासिमोव्ह हे वरिष्ठ लष्करी अधिकारी होते ज्यांचा दुसऱ्या चेचन युद्धात सहभागी होता. क्राइमिया ताब्यात घेतल्याबद्दल त्यांचा पदक देऊन सन्मान करण्यात आला होता.

रशिया आणि युक्रेनच्या शिष्टमंडळांमधील चर्चेची तिसरी फेरी सोमवारी बेलारूसमध्ये पार पडली. परंतु या वाटाघाटीतून विशेष काही निष्पन्न झाले नाही. त्याचबरोबर या दोन्ही देशांमध्ये पुढील चौथ्या फेरीचे देखील नियोजन केलेले आहे.

रशिया-युक्रेन परिस्थितीवर अमेरिकेने म्हटले आहे की, रशियाकडून तेल आयातीवर बंदी घालण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी गेल्या महिन्यात विशेष लष्करी कारवाईची घोषणा केल्यानंतर अमेरिका आणि इतर पाश्चात्य देशांनी रशियावर अनेक निर्बंध लादले आहेत.

भारतातील रशियन दूतावासाने दिली महत्वाची माहिती

भारतातील रशियन दूतावासाने दिलेल्या माहितीनुसार, युक्रेनमधील युद्धग्रस्त भागातून लोकांना बाहेर काढण्यासाठी मॉस्कोच्या वेळेनुसार सकाळी 10:00 वाजल्यापासून युद्धविराम जाहीर केला आहे. रशियाने मंगळवारी कीव्ह, चेर्निहीव्ह, सुमी, खार्किव्ह आणि मारियुपोल या शहरांमध्ये मानवतावादी कॉरिडॉर उघडण्यासाठी युद्धविराम घोषित केला. मॉस्कोच्या वेळेनुसार सकाळी 10 वाजल्यापासून युक्रेनमध्ये युद्धविराम घोषित करण्यात आला आहे.

भारताचे स्थायी प्रतिनिधी टीएस तिरुमूर्ती यांनी सांगितले की, भारताने सर्व निरपराध नागरिकांसाठी आणि युक्रेनमधील भारतीय नागरिकांसाठी सुरक्षित मार्गाची मागणी केली. अशी दोन्ही बाजूंनी विनंती करूनही, सुमीमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित कॉरिडॉर तयार होऊ शकला नाही.

टीएस तिरुमूर्ती यांनी UNSC बैठकीत सांगितले की, भारताने युक्रेन आणि त्याच्या शेजारी देशांना मानवतावादी मदत पाठवली आहे. यामध्ये औषधे, तंबू, पाणी साठविण्याच्या टाक्या, इतर मदत साहित्याचा समावेश आहे. आम्ही इतर अजून आवश्यकता ओळखून त्या पाठवण्याच्या प्रक्रियेत आहोत.

रोमानिया ते दिल्ली विशेष विमान

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन विशेष विमान रोमानियाहून दिल्लीला पोहोचले. युक्रेनमधून परतलेल्या एका विद्यार्थ्याने सांगितले की, दूतावासाचा सल्ला आल्यानंतर आम्ही खार्किव्ह सोडले आणि पिसोचिनला 25 किमी पायी प्रवास केला.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT