Latest

Rucha Hasabnis rashi : साथ निभाना साथिया फेम राशीच्या घरी बाळाचे आगमन

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : टेलीव्हिजन वरील प्रसिद्ध लोकप्रिय मालिका 'साथ निभाना साथिया' (Saath Nibhana Saathiya) फेम राशी दुसऱ्यांदा आई बनलीय. रूचा हसबनीस (Rucha Hasabnis rashi) हिने साथ निभाया साथियामध्ये राशी ही व्यक्तीरेखा साकारली होती. तिने या टीव्ही मालिकेतून अमाप लोकप्रियता मिळवली होती. रुचाने आपल्या बाळाचे स्वागत करत सोशल मीडिया अकाऊंटवर आनंदाची बातमी शेअर केलीय. तिने एक सुंदर पोस्ट लिहिलीय. तिने आपल्या बाळाची झलकदेखील शेअर केलीय. (Rucha Hasabnis rashi)

गरोदरपणातही साथ निभाना साथियाच्या राशीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचे अनेक सुंदर फोटो शेअर केले आहेत. मुलाची पहिली झलक शेअर करताना, अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले, "रुहीचा जोडीदार विलक्षण आहे आणि तो एक लहान मुलगा आहे". रुचाने या फोटोंमध्ये तिच्या बाळाचा चेहरा दाखवलेला नाही. यासोबत तिने एक फोटो शेअर केलाय. त्यामध्ये यू आर मॅजिक असं लिहिलेलं दिसतं.

टीव्ही अभिनेत्री रुचाने २०१५ मध्ये महाराष्ट्रीय रितीरिवाजांनुसार राहुल जगदाळेशी लग्न केले होते. तिने २०१९ मध्ये पहिल्या मुलीला रुहीला जन्म दिला होता. रुचा अनेकदा तिचे आणि मुलीचे अनेक सुंदर आणि सुंदर फोटो सोशल मीडियावर चाहत्यांसह शेअर करत असते.

SCROLL FOR NEXT