Latest

RRR For Oscars 2023 : ‘नाटू नाटू’ गाणे ऑस्करसाठी शॉर्टलिस्टेड, २ भारतीय डॉक्युमेंट्रीचाही समावेश

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : एसएस राजामौलीची 'आरआरआर' आणि गुजराती फिल्म दिग्दर्शक Pan Nalin 'द लास्ट फिल्म शो' (छैलो शो) ऑस्कर २०२३ ॲवॉर्ड्ससाठी शॉर्टलिस्ट करण्यात आली आहे. (RRR For Oscars 2023) याशिवाय दोन भारतीय डॉक्यूमेंट्री 'ऑल दॅट ब्रीथ्स' आणि 'द एलिफेंट्स व्हिस्पर्स' ची देखील निवड झाली आहे. ९५ व्या ऑस्कर ॲवॉर्डसाठी शॉर्टलिस्ट झालेले चित्रपट आणि डॉक्युमेंट्री वेगवेगळ्या विभागासाठी निवडण्यात आल्या आहेत. (RRR For Oscars 2023 )

'ॲकेडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस'ने १० श्रेणींमध्ये शॉर्टलिस्ट चित्रपट, डॉक्युमेंट्री आदींची घोषणा केली आहे. यामध्ये डॉक्युमेंट्री फीचर फिल्म, शॉर्ट डॉक्युमेंट्री फिल्म, इंटरनॅशनल फीचर फिल्म, मेकअप आणि हेअरस्टाइलिंग, म्युझिक (ओरिजिनल स्कोर), म्युझिक (ओरिजिनल सॉन्ग), एनिमेटेड शॉर्ट फिल्म, लाईव्ह ॲक्शन शॉर्ट फिल्म, साऊंड आणि विज्युअल इफेक्ट्सचा समावेश आहे.
प्रत्येक वर्षी भारतात कोणत्या ना कोणत्या चित्रपटाविषयी चर्चा होत राहते. आता आरआरआर हा चित्रपट ऑस्करच्या रेसमध्ये आहे.

चाहत्यांना अपेक्षा आहे की, आरआरआर नक्कीच 'ऑस्कर'मध्ये निवडला जाईल. दिग्दर्शक एस एस राजामौलीचा चित्रपट आरआरआर 'ऑस्कर'च्या रेसमध्ये आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. रामचरण आणि ज्युनियर एनटीआर स्टारर या चित्रपटाचे संपूर्ण देशात कौतुक झाले.

दरम्यान 95th Academy Awards च्या यादीत कंतारा चित्रपटही चर्चेत आहे, जो अनेक शानदार पुरस्कारांसाठी नॉमिनेटेड आहे. हा चित्रपट खूप पसंतीस उतरत आहे. याची एक वेगळी कहाणी आहे, जी प्रेक्षकांच्या मनावर रुंजी घालत आहे. या चित्रपटाचे निर्माते विजय किरगंदूर यांनी सांगितलं की, ऑस्करसाठी या चित्रपटाचा अर्ज दाखल करण्यात आला आहे. एका इंग्रजी वेबसाईटशी बोलतना निर्माते विजय यांनी ही माहिती दिली. पण, अद्याप याबाबतची अपडेट ऑस्करकडून आलेली नाही. कांतारादेखील भारतात प्रत्येक भाषेत पसंतीस उतरली आहे. याशिवाय, ऋषभ शेट्टी यांचा कंतारादेखील नॉमिनेटेड आहे.

अधिक वाचा-

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT