Latest

Ritesh Deshmukh : एखाद्या चित्रपटाला ‘बॉयकॉट’ करणे प्रेक्षकांचा अधिकार

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे. जर एखाद्या चित्रपटाला 'बॉयकॉट' केले जात असेल तर तो त्याचा अधिकार आहे. प्रत्येकाचा बघण्याचा वेगळा द़ृष्टिकोन असतो. त्यामुळे चित्रपटांबाबत एखादा ट्रेंड चालविला जात असेल तर तो त्यांच्या मानसिकतेचा भाग आहे, असे स्पष्ट मत अभिनेता रितेश देशमुख याने व्यक्त केले.

नाशिक : 'मुहूरत' या भव्य शॉपिंग मॉलचे उद्घाटन करताना अभिनेत्री जेनेलिया देशमुख व अभिनेता रितेश देशमुख.
नाशिक : 'मुहूरत' या भव्य शॉपिंग मॉलचे उद्घाटन करताना अभिनेत्री जेनेलिया देशमुख व अभिनेता रितेश देशमुख.

एबीबी सर्कलजवळील 'मुहूरत' या भव्य फॅमिली शॉपिंग मॉलच्या उद्घाटनासाठी नाशिकमध्ये आलेल्या रितेशने पत्रकारांशी संवाद साधताना, 'बॉयकॉट' या ट्रेंडवर आपले मत व्यक्त केले. याप्रसंगी रितेशची पत्नी आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुखदेखील उपस्थित होती. रितेश म्हणाला की, 'जेव्हा एखादा चित्रपट प्रेक्षकांकडून नाकारला जातो, तेव्हा त्या चित्रपटात दोष नसून कलाकारांमध्ये दोष असतो. त्यामुळे प्रेक्षक जर त्या चित्रपटाला नाकारत असतील तर तो त्यांचा अधिकार आहे. यावेळी एखाद्या विशिष्ट विचारधारेच्या चित्रपटांनाच पसंती दिली जात असल्याबाबत विचारले असता रितेश म्हणाला की, 'प्रत्येकाचा बघण्याचा द़ृष्टिकोन असतो. मात्र, चित्रपटांमधून मनोरंजनच हवे, ही बाब प्रत्येकाने लक्षात घ्यावी.' नाशिकचे कौतुक करताना रितेश म्हणाला की, 'नाशिक हे मोठे शहर आहे. शहर मोठे होते, तेव्हाच ते प्रगतीकडे झेप घेते. कोणत्याही शहराची प्रगती ट्रेडर्सवर ठरते. वस्त्रोउद्योग हा त्यामधील महत्त्वाचा भाग असून, 'मुहूरत' हे त्याचेच प्रतीक आहे. नाशिक-हैदराबाद हे कनेक्शनदेखील नाशिकच्या मॉल संस्कृतीला बळ देणारे आहे.'

दरम्यान, 'मुहूरत' या तीनमजली भव्य मॉलचे थाटात उद्घाटन करण्यात आले असून, या मॉलमध्ये लहानग्यांपासून ते तरुण, प्रौढ, वयोवृद्धांपर्यंतचे कपडे उपलब्ध आहेत. साड्या, ब—ायडल वेअर, पार्टीवेअर, कुर्तीस, पारंपरिक भारतीय आणि वेस्टर्न, किड्स वेअर, लहानांपासून मुला-मुलींसाठी, मेन्सवेअर, ब—ँड्स, फॅशन कॅज्यूअल्स्, पार्टीवेअर, एथनिक वेअर लग्नसोहळा, सण-समारंभ, वाढदिवस अशा सर्व प्रकारचे सामान्यांना परवडतील असे कपडे याठिकाणी उपलब्ध आहेत. मुहूरतमुळे आता सर्व काही येथेच उपलब्ध होणार आहे.

दोन भाऊ राजकारणात
राजकारणाबाबत रितेशला विचारले असता, माझे दोन भाऊ राजकारणात आहेत. त्यामुळे मला राजकारणात येण्याची गरज वाटत नाही. 'सध्या सगळेच वेगळी दिशा घेऊन चालले आहेत', असे म्हणून त्याने राज्यातील सध्याच्या राजकारणावर आपले मत व्यक्त केले. मात्र अधिक बोलणे टाळले. यावेळी खासगी बस दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजलीही वाहण्यात आली.

बायकोसाठी प्लॅन ए व बी
पत्नी जेनेलियाशी वाद झाल्यानंतर तिची समजूत काढण्यासाठी 'प्लॅन ए व प्लॅन बी' नेमका काय प्रकार आहे, असे विचारले असता रितेश म्हणाला की, 'प्लॅन 'ए'मध्ये मी सॉरी म्हणतो आणि प्लॅन 'बी'मध्ये व्हेरी व्हेरी सॉरी असे म्हणतो' हे उत्तर देताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. यावेळी स्टाइल स्टेटमेंटविषयी सांगताना रितेश आणि जेनेलिया म्हणाली की, दिवाळीत कृर्ता, पायजमा आणि साडी या आउटफिटला आम्ही पसंती देऊ.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT