Latest

ऋषभ पंतच्‍या प्रकृतीत सुधारणा; ‘आयसीयू’मधून बाहेर, संसर्ग टाळण्‍यासाठी खासगी वॉर्डमध्‍ये हलवण्‍यात आले

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : अपघातामध्‍ये गंभीर जखमी झालेला भारतीय क्रिकेट संघाचा यष्‍टीरक्षक ऋषभ पंत यांच्‍यावर डेहराडूनमधील मॅक्‍स हॉस्‍पिटलमध्‍ये उपचार सुरु आहेत. त्‍याच्‍या प्रकृतीमध्‍ये झपाट्याने सुधारणा होत असून आज ( दि. २ ) त्‍याला अतिदक्षता विभागातून ( आयसीयू ) खासगी वॉर्डमध्‍ये हलविण्‍यात आले आहे. पाच तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक त्यांच्यावर उपचार करत आहेत. पंतच्‍या प्रकृतीमध्‍ये सुधारणा होत आहे. तसेच 'आयसीयू'वॉर्डमध्ये असणारा संसर्गाचा धोका टाळण्यासाठी त्‍याला खासगी वॉर्डमध्‍ये हलवण्यात आल्‍याचे 'एएनआय'वृत्तसंस्‍थेने म्‍हटले आहे.

ऋषभ पंत याच्‍या कारला शुक्रवारी ( दि. ३० ) पहाटे भीषण अपघात झाला होता. त्‍याला डेहराडूनमधील मॅक्‍स हॉस्‍पिटलमध्‍ये उपचारासाठी दाखल केले होते. दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या ( DDCA) संचालक श्‍याम शर्मा यांनी स्‍पष्‍ट केले होते की, ऋषभ पंतवरील उपचाराबाबत देशातील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्‍ला घेतला जात आहे. सध्‍या तरी त्‍याच्‍यावर डेहराडून येथेच उपचार होणार आहेत. या वेळी श्‍याम शर्मा म्‍हणाले होते की, "ऋषभ पंतचा अपघात हा त्‍याला झोप लागल्‍यामुळे झाला नाही तर रस्‍त्‍यावर असणारा खड्‍डा चुकवत असताना ऋषभ पंतचे कारवरील नियंत्रण सुटले. त्‍यामुळे हा अपघात झाला." भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्‍या
( बीसीसीआय ) तीन सदस्‍यांनी ऋषभ पंतची भेट घेतली होती. यामधील एक कायदेशीर सल्‍लागारही होते.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT