पुढारी ऑनलाईन डेस्क : शुक्रवारी पहाटे भारताचा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतचा अपघात झाला. या अपघातात तो गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती स्थिर आहे. या अपघातानंतर पंतला पुढील उपचारासाठी मॅक्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यामध्ये ऋषभ चालवत असलेले वाहन वेगात दुभाजकाला धडकल्याचे दिसते. यावरून त्याच्या वाहनाचा वेगही अधिक असल्याचे स्पष्ट दिसते. यावरून यूपी पोलिसांनी ऋषभच्या वाहनाचा वेग किती होता याबद्दल तपासणी सुरू केली आहे. (Rishabh Pant Accident)
ऋषभ पंतला यूपी पोलिसांनी मर्सिडीज कार भरधाव वेगाने चालवल्याबद्दल दोनदा चलान केले आहे. या दोन्ही चलानवर ऋषभने उत्तर दिलेले नाही. मोटार वाहन कायद्याच्या उल्लंघनामुळे ऋषभ पंतही मोठ्या अडचणीत येऊ शकतो. जाणून घ्या ऋषभवर काय होऊ शकते कारवाई क्रिकेटपटू ऋषभ पंतचा दिल्लीहून उत्तराखंडला घरी जाताना भीषण अपघात झाला. ऋषभ पंत स्वतःची मर्सिडीज बेंझ कार चालवत असताना शुक्रवारी पहाटे ५.३० च्या सुमारास रुरकीजवळ दुभाजकावर गाडी आदळून अपघात झाला. ही धडक इतकी भीषण होती की अपघातानंतर कार जळून खाक झाली. आग लागण्याच्या काही सेकंद आधी कारची खिडकी फोडून ऋषभ पंतला बाहेर काढण्यात आले. (Rishabh Pant Accident)
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या अपघाताच्या व्हिडिओमध्ये ऋषभची कार सुसाट वेगाने डिव्हायडरला धडकताना दिसत आहे. तर, याच वर्षी ऋषभ पंतला ओव्हरस्पीडिंगसाठी दोनदा चलान करण्यात आल्याचे समोर आले आहे. दोन्ही चलनाच्या वेळी तो मर्सिडीज (DL10CN1717) चालवत होता. हे चालान यूपी पोलिसांनी केले आहे. चलान न भरल्याने त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. ही कारवाई आर्थिक दंडापासून तुरुंगात पाठवण्यापर्यंतची शिक्षेची तरतूद आहे.
दिल्ली मेरठ एक्स्प्रेस वेवर ओव्हरस्पीडिंग केल्याबद्दल उत्तर प्रदेश पोलिसांनी ऋषभ पंतला दोनदा चलान केले आहे. यावर्षी प्रथमच २२ फेब्रुवारी रोजी यूपी पोलिसांनी चलान केले. यानंतर २५ मे रोजी सायंकाळी 5 वाजता ऋषभ पंतचे चलान कापण्यात आले. चलान होवूनही त्याने दंड अजून भरलेला नाही.
क्रिकेटपटू ऋषभ पंतने मोटार वाहन कायदा १९८८ चे दोनदा उल्लंघन केले आहे. यूपी पोलिसांनी त्याचे दोन्ही वेळा चलन केले. यानंतर यूपी पोलिसांनी त्याला दोनदा नोटीसही पाठवली आहे. नियमानुसार, नोटीस मिळाल्यापासून ७ दिवसांच्या आत वाहन चालवणाऱ्या व्यक्तीचे नाव-पत्ता, ड्रायव्हिंग लायसन्स क्रमांक आणि इतर माहिती द्यावी लागते.
ही माहिती देण्यात अयशस्वी झाल्यास ५०० रुपये दंड किंवा ३ महिन्यांचा तुरुंगवास किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. दुसरीकडे अशी नोटीस दुसऱ्यांदा बजावल्यास माहिती न दिल्यास ६ महिने कारावास किंवा एक हजार रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांनी दोन्ही वेळा नोटिसांना उत्तर दिलेले नाही. अशा परिस्थितीत यूपी पोलीस ऋषभ पंतला ६ महिने तुरुंगवास किंवा १००० दंड आणि दोन्ही शिक्षा देऊ शकतात.
हेही वाचा;