पुढारी ऑनलाईन डेस्क :
बंडखोर आमदारांच्या गटाने बाळासाहेब ठाकरे यांचे नाव वापरण्याची हिंमत करु नये, असा इशारा आज ( दि. 25 ) शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला. बंडखोरांवर कारवाईचे सर्व अधिकार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना देण्यात आले आहेत, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक झाली. यानंतर माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले, "आजच्या बैठकीत दोन महत्त्वाचे ठराव मंजूर झाले. शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांची आहे आणि राहील, असा महत्त्वाचा ठराव यावेळी करण्यात आला. शिवसेना महाराष्ट्रातून बाळासाहेबांचा विचार पुढे घेवून जाईल."
बाळासाहेबांचे नाव इतर राजकीय पक्षाला वापरता येणार नाही. ज्यांना मत मागायची आहेत त्यांनी आपल्या बापाच्या नावाने मते मागावित, असेही उद्धव ठाकरे यांनी बैठकीत स्पष्ट केल्याचे त्यांनी सांगितले. आगामी निवडणुका आम्ही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालीच लढवणार आहोत. बंडखोर आमदारांवर लवकर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. कायदेशीर लढाई शिवसेना कमी पडणार नाही. महाविकास आघाडी मजबूत आहे आणि राहील, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
हेही वाचा :