Latest

टाटा नॅनोमध्ये प्रवास करताना रतन टाटा यांचा व्हिडिओ व्हायरल

अविनाश सुतार

मुंबई; पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा हे त्यांच्या साधेपणामुळे अनेकदा चर्चेत येत असतात. सध्या त्यांच्या ताज हॉटेलकडे नॅनो कारने जाताना एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. शंतनू नायडूंसोबत ते पांढऱ्या रंगाच्या नॅनो मधून प्रवास करताना यामध्ये दिसून येत असून नेटकऱ्यांनी या व्हिडिओला ट्रेंडिंग व्हिडीओ केला आहे.

टाटा नॅनो हा रतन टाटांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि याबद्दल त्यांनी हल्लीच सोशल मीडियावर एक पोस्टही शेअर केली आहे, ज्यामध्ये त्यांनी या कार बद्दल आपले विचार मांडले आहेत. ते म्हणतात की, 'मी खूपदा अनेक सामान्य लोक स्कुटरवरून कुटुंबाला घेऊन जाताना पाहत असतो, यामध्ये लहान मूल मधोमध सँडविचसारखं बसलेलं असतं. यामुळे मला नॅनो बनवण्याची प्रेरणा मिळाली.'

टाटा मोटर्सने टाटा नॅनो १ लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीने १० जानेवारी २००८ मध्ये भारतात लॉन्च केली होती.

हेही नक्की वाचा….

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT