

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताची मुख्य विमान सेवा कंपनी Air India. अनेक वर्षांपासून Air India तोट्यात आहे. त्यामुळे भारत सरकारने या कंपनीच खासगीकरण केलं आहे. Air India ही कंपनी टाटा ग्रुपने घेतली आहे. काही दिवसांपूर्वी कागदोपत्री Air India चा आता पुन्हा एकदा टाटा ग्रुपमध्ये समावेश झाला आहे. तब्बल ७५ वर्षांनंतर एअर इंडिया पुन्हा टाटा समुहाकडे आली आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, या कंपनीच नाव Air India कस पडल होतं? चला तर जाणून घेऊया…
यात टाटा ग्रुपमधील कर्मचाऱ्यांपुढे चार नावे ठेवली होती. यातील फक्त एक नाव निवडले. यानंतर देशाची पहिली एअर लाईन कंपनीचे नाव Air india ठेवण्यात आले.
टाटा ग्रुपने ही माहिती एअर इंडियाचा टाटा ग्रुप मध्ये समावेश झाल्यानंतर आज ट्विटवरुन दिली आहे. सात दशके अगोदर टाटा ग्रुपकडून एअर इंडियाचे नियंत्रण सरकारने काढून घेतले होते. त्यावेळी १९४६ मध्ये जेव्हा टाटा एअर लाइन्सचा विस्तार टाटा सन्सच्या एका विभागातून कंपनीत झाला, तेव्हा एक नाव निवडावे लागले होते. हीच घटना आज टाटा ग्रुपने शेअर केली आहे.
"इंडियन एअरलाइन्स, पॅन-इंडियन एअरलाइन्स, ट्रान्स-इंडियन एअरलाइन्स आणि एअर इंडिया ही नाव एअर इंडिया कंपनीच्या नावाला पर्याय म्हणून आला होता", अस या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
टाटा ग्रुपने बॉम्बे हाऊस येथे नमुना मत सर्वेक्षणाद्वारे लोकशाही पद्धतीने लोकप्रिय नाव निवडण्याची योजना आखल्याचे सांगण्यात आले. टाटा कर्मचाऱ्यांमध्ये नावांची मते जाणून घेण्यासाठी मतदान पत्रे वितरित करण्यात आली आणि त्यांना त्यांची पहिली व दुसरी पसंती सांगण्याची विनंती करण्यात आली होती.
पहिल्या मोजणीत Air India साठी ६४, इंडियन एअरलाइन्स साठी ५१, ट्रांस-इंडियन एयर लाइन्ससाठी २८, पॅन इंडियन एअर लाईन्ससाठी १९ मतं मिळाली होती. जेव्हा सर्वात कमी पसंतीची नावे काढून टाकली तेव्हा अंतिम मोजणीत एअर-इंडियासाठी ७२ आणि इंडियन एअर लाइन्ससाठी ५८ मते मिळाली होती. त्यामुळे कंपनीचे नाव एअर इंडिया म्हणून निवडले गेले.
ही माहिती टाटा समूहाने ट्विटरवर शेअर केली असून ती एअर इंडियानेही शेअर केली आहे. एका स्पर्धात्मक लिलावात टाटा समूहाने एअर इंडियाला सरकारकडून १८००० कोटींना विकत घेतले आहे.
हेही वाचलत का?