TATA Nano : टाटाची स्वस्तात मस्त नॅनो बनली इलेक्ट्रिक कार, रतन टाटांनी घेतला टेस्ट ड्राइव्हचा आनंद | पुढारी

TATA Nano : टाटाची स्वस्तात मस्त नॅनो बनली इलेक्ट्रिक कार, रतन टाटांनी घेतला टेस्ट ड्राइव्हचा आनंद

पुढारी ऑनलाईन डेस्क : इलेक्ट्रिक कारची क्रेझ भारताता दिवसेंदिवस वाढत आहे. वाहन निर्मितीमध्ये दिग्गज मानल्या जाणाऱ्या वाहन निर्मात्या कंपन्या नव्या इलेक्ट्रिक कारच्या बाजारात पकड मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अशातच देशातील सगळ्यात स्वस्त असलेली टाटा नॅनो कंपनीही मागे नाही. tata nano

टाटा नॅनो ही कार इलेक्ट्रोड्राईव्ह पॉवरट्रेन सॉल्युशंस प्रायवेट लिमिटेड कडून सुधारीत करण्यात आली आहे. आता ही पुर्णपणे इलेक्ट्रिक कार झाली आहे.  इलेक्ट्रिक कार बाबत रतन टाटा यांचा एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये रतन टाटा इलेक्ट्रिक कारच्या शेजारी उभारलेले आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिंक्डइन वर रतन टाटांचा हा फोटो नवनिर्मित कार बरोबर शेअर केला आहे.

टाटांच्या नॅनो मध्ये बदल केले आहेत हे लोकांना समजल्यानंतर रतन टाटांची ही पोस्ट मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे. सोबतच या पोस्टवर अनेक प्रतिक्रियाही देत आहेत. ही कार इलेक्ट्रोड्राईव्ह पॉवरट्रेन सॉल्युशंस प्रायवेट लिमिटेड कडून सुधारीत करण्यात आली आहे. फोटो शेअर करत असताना कंपनीने कॅप्शनमध्ये म्हटले आहे की टाटा यांना ७२V tata Nano EV ची डिलिव्हिरी देणे आणि त्याबद्दल टाटांचा अभिप्राय जाणून घेणे ही अभिमानाची गोष्ट आहे. रतन टाटा यांनी याबद्दल अभिप्राय दिला हा आमचा गौरव आहे.

टाटा नॅनो या कारमध्ये लिथियम आयन बॅटरीचा वापर केल्याने आता ही कार पुर्णपणे इलेक्ट्रिक कारमध्ये रुपांतरित झाली आहे. इलेक्ट्रा ईवी कंपनीने या कारमध्ये हे बदल केले आहेत.

वेगाचा विचार केला तर कारला ६० किमी किमीचा वेग पकडण्यासाठी १० सेकंद लागतात. तर ही गाडी एकदा चार्ज केल्यानंतर १६० किलोमीटर पर्यंत जाऊ शकते. ग्राहकांना पर्यावरणाच्या दृष्टीने आरामदायी प्रवास या कार मध्ये करता येऊ शकेल, असे कंपनी कडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचलतं का?

Back to top button