पुढारी ऑनलाईन डेस्क : अफगाणिस्तानचा अष्टपैलू खेळाडू रशीद खान याने आयपीएलच्या यंदाच्या हंगामात चमकदार कामगिरी केली. गुजरात संघाने आयपीएल चषक पटकविण्यात रशीद खानचा मोठा वाटा होता. आता आयपीएलनंतर तो अफगाणिस्तानसाठी मैदानात उतरला आहे. ( Rashid khan Blindly hit six )
सध्या अफगाणिस्तान संघ हा झिम्बाबे दौर्यावर आहे. या दोन्ही संघात ३ एकदिवसीय सामने व तीन टी-२० सामने होणार आहेत. पहिल्या वन डे सामन्यात अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत हा सामना ६० धावांनी जिंकला. या सामन्यात सर्वांच्या लक्षात राहिला तो रशीद खान याने डोळ बंद करुन ठोकलेला कडक षटकार. सध्या या षटकाराचा व्हिडीओ क्रिकेटप्रेमीच्या पसंतीच उतरत आहे.
झिम्बाबे विरुद्धच्या पहिल्या वन डे सामन्यात अफगाणिस्तान संघाने गोलंदाजी आणि फलंदाजीत दमदार कामगिरी केली. रशिद खानने १७ चेंडूत ३९ धावा केल्या. यामध्ये ४ चौकार आणि २ षटकारांचा समावेश आहे. गोलंदाजीतह त्याने दमदार कामगिरी करत १० षटकांमध्ये ३९ धावा देत दोन बळी घेतले. या सामन्यात अफगाणिस्तानच्या मोहमम्द नबी याने ४ बळी घेतले. तर हमत शाह याने धडाकेबाज फलंदाजी करत १२० चेंडूत ९४ धावांची खेळी केली. तर अफगाणिस्तानचा कर्णधार हशमतुल्ला शाहीदी याने १०४ चेंडूत ८८ धावांची खेळी केल्याने संघाची धावसंख्या २७६ झाली.
या सामन्यात रशीद खानच्या फलंदाजीचे कौतुक झाले. त्याने आपल्या षटकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये रशीद खान वेगवान गोलंदाजाला डोळे झाकून जोरदार षटकार मारत आहे. त्याचा या कडक षटकाराचा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. डोळे बंद करुन खाली बसून मारलेला चेंडू थेट मैदानाबाहेर गेल्याने चाहतेही अचंबित होत आहेत. रशीद खानच्या फॅन्सची या व्हिडीओला भरभरुन दाद मिळत आहे.
हेही वाचा :