Latest

RANVEER SINGH DEEPIKA PADUKONE BUY FLAT : दीपिका पदुकोण रणवीर सिंह बनले शाहरुख खानचे शेजारी

अमृता चौगुले

मुंबई; पुढारी ऑनलाईन : बॉलिवूडमध्ये दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह (RANVEER SINGH DEEPIKA PADUKONE BUY FLAT) सर्वात ॲडोरेबल कपल म्हणून ओळखले जाते. यांची जोडी फक्त ऑन स्क्रीनच नाही तर ऑफ स्क्रिनसुद्धा चाहते यांना पसंद करतात. अलीकडेच एक बातमी समोर आली की, दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह यांनी ११९ कोटींचे घर खरेदी केले आहे. विशेष म्हणजे हे घर खरेदी करुन हे दोघे बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खान यांचे शेजारी बनले आहेत. रणवीर सिंह याने मुंबईतील बांद्रास्टँडच्या परिसरात रेशम टॉवर मध्ये एक चार मजली सी व्ह्युव असणारा आलिशान घर खरेदी केले आहे. या इमारतीमधील १६ ते १९ व्या मजल्यावर त्यांचा हा आलिशान फ्लॅट आहे.

सध्या दीपिका आणि रणवीरच्या (RANVEER SINGH DEEPIKA PADUKONE BUY FLAT) नव्या घराचे फोटो सोशल माध्यमांवर व्हायरल झालेचे पाहायला मिळाले. या फोटोंना विरल भयानी या अधिकृत इन्स्टा पेज वरुन शेअर करण्यात आले आहे. या फोटोंमध्ये आपण पाहू शकता की, घराच्या कन्स्ट्रक्शनचे काम सुरु आहे. काहीच वेळात या पोस्टला हजारोंच्या संख्येत लाईक्स मिळाले आहेत. सोशल मीडिया युजर्स दीपिका आणि रणवीर यांच्या नव्या घरासाठी शुभेच्छा देत आहेत. शिवाय ते शाहरुख खान याचे शेजारी झाल्यामुळे सुद्धा आनंद व्यक्त करत आहेत.

याशिवाय काही सोशल मीडिया युजर्सनी विनोदी कमेंटस केली आहे. ज्या वाचून तुम्ही सुद्धा लोटपोट होऊन हसाल. एका युजर्सने मजेशीर कमेंट केली आहे, तो म्हणतो 'आता हे दोघे दुध आणि साखर मागण्यासाठी शाहरुखच्या घरी जावू शकतात'. तर आणखी एक युजर्स असे म्हणतो, 'अब होगा असली दम मारो दम'. तर आणखी एकजण म्हणतो, '११९ कोटींमध्ये तर संपुर्ण देशातील गरिबी संपली असती'. (RANVEER SINGH DEEPIKA PADUKONE BUY FLAT)

अधीक वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT