Latest

Ram Mandir Inauguration : प्रभू श्रीरामांसाठी २.५ किलोंचे सोन्याचे धनुष्य

मोहन कारंडे

अयोध्या; वृत्तसंस्था : प्राणप्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर प्रभू श्रीरामांसाठी 2.5 किलो वजनाचे धनुष्य तयार करण्यात आले आहे. धनुष्य बनविण्याची 200 वर्षांची परंपरा असणार्‍या चेन्नईतील कारागिरांकडून हे धनुष्य तयार करण्यात आले आहे. यासाठी 23 कॅरेटच्या शुद्ध सोन्याचा 700 ग्रॅमपर्यंतचा वापर करण्यात आला आहे. (Ram Mandir Inauguration)

संबंधित बातम्या : 

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राकडे हे धनुष्य प्रदान करण्यात येणार आहे. 'वाल्मीकी रामायणा'तील वर्णनानुसार हे धनुष्य तयार करण्यात आले आहे. प्रभू श्रीराम यांच्याकडे धनुष्य कायम असे. त्यामुळे धार्मिक शास्त्रानुसार या धनुष्याची निर्मिती करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. दि. 19 जानेवारी रोजी हे धनुष्य ट्रस्टला दान करण्यात येणार आहे. (Ram Mandir Inauguration)

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT