Latest

पुण्यश्लोक अहिल्याबाई : ‘सती’ प्रथेविषयी राजेश शृंगारपुरेने मांडले मत

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनावर आधारित सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील पुण्यश्लोक अहिल्याबाई ही ऐतिहासिक मालिका सुरु आहे. त्यातील आकर्षक कथानकामुळे प्रेक्षकांनी पहिल्यापासूनच त्यांना डोक्यावर घेतले आहे.  (पुण्यश्लोक अहिल्याबाई) या मालिकेत अहिल्याबाईंच्या उदात्त कार्याचे चित्रण आहे. अहिल्याबाई आपल्या काळाच्या खूप पुढे असलेली स्त्री. ज्यांनी आपले सासरे मल्हारराव होळकर यांच्या भक्कम पाठिंब्याच्या बळावर समाजातील अनिष्ट रूढींचा विरोध केला आणि लोकांच्या कल्याणासाठी त्या आयुष्यभर झिजल्या. सध्या सुरू असलेल्या कथानकात 'सती' या सामाजिक समस्येवर प्रकाश टाकण्यात आला आहे. खंडेराव होळकर यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर अहिल्याबाईंच्या जीवनातील हा आणखी एक महत्त्वपूर्ण अध्याय आहे. (पुण्यश्लोक अहिल्याबाई)

अहिल्याबाई त्यांनी केलेल्या विविध सुधारणांबद्दल ओळखल्या जातात. सती प्रथा नष्ट करणे, त्यापैकीच एक आहे. कुम्हेरच्या लढाईत जेव्हा खंडेराव हुतात्मा झाला. तेव्हा अहिल्याबाईंनी जीवनातील सर्व इच्छा-आकांक्षांवर पाणी सोडले आणि आपल्या दिवंगत पतीसोबत सती जाण्याचे ठरवले. मल्हारराव होळकर हे पहिल्यापासून अहिल्याबाईंच्या जीवनाचे आधारस्तंभ होते. अहिल्याबाईंना सती जण्यापासून परावृत्त करणारे मल्हारराव होळकरच होते. त्यांना ठामपणे असे वाटत होते की, केवळ अहिल्याबाईंमध्येच राज्यकारभार सांभाळण्याची क्षमता आहे. ते खंबीरपणे पाठीशी उभे राहिले आणि त्यांना सती जाण्यापासून परावृत्त केले.

या कथानकाविषयी बोलताना राजेश शृंगारपुरे म्हणाला, "त्या काळी, विशेषतः रूढीवादी वर्तुळात, जेथे सतीची प्रथा खोलवर रुजलेली होती, त्यावेळी मल्हाररावांनी जे केले ते केवळ कौतुकास्पदच नाही. तर आपली मान अभिमानाने ताठ करणारे कृत्य होते. त्याकाळी स्त्रीवाद ही संकल्पनाच आलेली नव्हती. पण या घटनेवरून आपल्याला हा अंदाज बांधता येतो की, लोकांच्या मनात स्त्री-पुरुष समतेचे विचार तेव्हा घोळू लागले होते. आपल्या सुनेला सती जाण्यापासून परावृत्त करून त्यांनी इतिहासाला वेगळे वळण दिले. इतिहासातील हे उत्तुंग व्यक्तिमत्व मी साकारत असल्याचा मला अभिमान आहे. मल्हाररावांच्या व्यक्तिरेखेतून हा प्रत्यय आपल्याला येतो की, स्त्री-पुरुष समतेचा विचार लोक त्या काळी करू लागले होते आणि हातात अधिकार असलेले काही लोक ही समता समाजात आणण्यासाठी प्रयत्नशील देखील होते.सासरा आपल्या सुनेला सांगतो, तेही त्या काळात, की तिने सती जाऊ नये. कारण त्याच्या मुलाच्या मृत्यूनंतर राज्याकडे लक्ष देण्यासाठी, प्रजेची काळजी घेण्यासाठी तीच समर्थ आहे. इतकी पुरोगामी आणि प्रेरणादायक कथा लोकांपुढे आणण्याची संधी आम्हाला मिळाली आहे, त्याचा आम्हाला अभिमान वाटतो."

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT