Latest

Breaking : Rain forecast : पुढील तीन दिवस राज्यात सर्वत्र पाऊस

backup backup

पुणे : पुढारी वृत्तसेवा : बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात तीन दिवस सर्वदूर पावसाची (Rain forecast) शक्यता हवामान विभागाने आज एक डिसेंबर रोजी सकाळी वर्तवली आहे. राज्यात प्रामुख्याने पालघर, मुंबई नाशिक, धुळे, नंदुरबार, सांगली या भागात मुसळधार तर उर्वरित राज्यातील 17 जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यात सर्वत्र ढग दाटून आले असून सर्वत्र धुक्याची चादर पहावयास मिळत आहे.

त्यात बहुतांश भागात रिमझिम पाऊस सुरू असल्याने जनजीवन विस्कळित झाले. चाकरमानी वर्गाची अचानक आलेल्या पावसाने चांगलीच पंचाईत झाली. रेनकोट, छत्री, स्वेटर घालूनच लोक घराबाहेर बाहेर पडले आहेत. पुणे शहरात पहाटे पासूनच संततधार पावसाला सुरुवात झाली. धुके खूप खाली आल्याने वातावरण पावसाळी झाले आहे. (Rain forecast)

दरम्यान, मुंबई शहरातही वाऱ्यासह पाऊस आहे. ढगाळ वातावरणामुळे सकाळच्या वेळीही अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे भरदिवसा अंधुक वातावरणात वाहनांना हेडलाईट सुरु ठेवून प्रवास करावा लागत आहे. संथ गतीने वाहतूक सुरु आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील काही भागांत सकाळी हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला. गेल्या काही दिवसांपासून अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : Travel Vlog | वीकेंडला फिरता येईल असं कोल्हापूरपासून जवळच ठिकाण

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT