Latest

Rain Disaster : इटलीत मुसळधार पावसाने विध्वंस; किमान ९ जणांचा मृत्यू; हजारो लोकांना सुरक्षित स्थळी हलवले

backup backup

पुढारी ऑनलाइन डेस्क : Rain Disaster : इटलीत मुसळधार पावसामुळे मोठा विध्वंस झाला आहे. आतापर्यंत ८ ते ९ जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तर एमिलिया रोमाग्ना भागात मुसळधार पावसाने हाहाकार उडाला आहे. शहरात सर्वत्र पाणी घुसले आहे. रस्ते जलमय झाले आहेत. हजारो एकर शेती पाण्याखाली गेली आहे. आतापर्यंत हजारो लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. या नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत ८ ते ९ लोकांनी आपला जीव गमावला आहे. एएफपी न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, ८ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर रॉयटर्सने ९ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. जाणून घ्या सविस्तर माहिती…Rain Disaster

इटलीच्या उत्तर एमिलिया रोमाग्ना भागात मुसळधार पावसामुळे विध्वंस (Rain Disaster) झाल्यामुळे आठ लोकांचा मृत्यू झाला आणि हजारो लोकांना त्यांच्या घरातून बाहेर काढण्यात आले, असे ट्विट एएनआयने एएफपी न्यूजच्या हवाल्याने दिले आहे.

तर रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, इटलीच्या उत्तर एमिलिया-रोमाग्ना प्रदेशात मुसळधार पावसाने पूर आणि भूस्खलन होत असल्याने आतापर्यंत किमान ९ जणांचा मृत्यू झाला आहे. (Rain Disaster) हजारो लोकांना त्यांच्या घरातून सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे, असे अधिकाऱ्यांनी बुधवारी सांगितल्याचे रॉयटर्सने म्हटले आहे.

नागरी संरक्षण मंत्री नेलो मुसुमेसी यांनी सांगितले की, काही भागात अवघ्या 36 तासांत वार्षिक सरासरी निम्मा पाऊस पडला, त्यामुळे नद्यांचे पात्र फुटले, शहरांमधून पाणी वाहून गेले आणि हजारो एकर शेतजमीन पाण्याखाली गेली, अशी माहिती दिली आहे.(Rain Disaster)

हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT