Morgan Stanley Report : चालू आर्थिक वर्षात भारताचा जागतिक जीडीपीत १६ % वाटा; मॉर्गन स्टॅन्लेचा अहवाल | पुढारी

Morgan Stanley Report : चालू आर्थिक वर्षात भारताचा जागतिक जीडीपीत १६ % वाटा; मॉर्गन स्टॅन्लेचा अहवाल

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : जागतिक पातळीवर अद्यापही आर्थिक अनिश्चितता आणि मंदीची परिस्थिती असूनही, कोरोनानंतरच्या काळातील भारताची कोरोना पूर्वपदावर येण्याची वाटचाल वेगवान व मजबूत असल्याने भारताची जीडीपी वाढ 6 टक्क्यांवर राहील, असे अनुमान गुंतवणूक बँकर मॉर्गन स्टॅन्लेने प्रसिद्ध केलेल्या अहवालातून काढण्यात आले आहे. (Morgan Stanley Report)

चालू आर्थिक वर्षात म्हणजेच 2023-24 दरम्यान जागतिक जीडीपीमध्येही भारताचे योगदान 16 टक्के असेल, असेही या अहवालात म्हटले आहे. भारताचा खरेदी व्यवस्थापन निदेशांक 13 वर्षांच्या उच्चांकावर, तर उत्पादन निदेशांक 11 वर्षांच्या उच्चांकावर आहे. जगातील अन्य अनेक अर्थव्यवस्थांच्या तुलनेत भारताचे हे निदेशांक जास्त आहे. निर्यातीतील घसरणीची भर मजबूत देशांतर्गत मागणी आणि सेवा निर्यातीमुळे भरून निघेल, असेही मॉर्गन स्टेन्लेने स्पष्ट केले आहे. (Morgan Stanley Report)

आकडे बोलतात…

  • कोरोनापूर्वकाळापेक्षा प्रवासी वाहनांची विक्री भारतात 131 टक्क्यांनी वाढली.
  • जीएसटी संकलन कोरोनापूर्व पातळीपेक्षा 35 टक्क्यांनी जास्त आहे.
  • ऑक्टोबर 2020 पासून सेवा निर्यात 84 टक्क्यांनी वाढली आहे.

अधिक वाचा :

Back to top button