पुणे: दागिन्यांसह लग्नाचा खर्च करायला लावून ऐनवेळी नकार, नवरदेवासह पाच जणांवर गुन्हा; आळंदी येथील प्रकार | पुढारी

पुणे: दागिन्यांसह लग्नाचा खर्च करायला लावून ऐनवेळी नकार, नवरदेवासह पाच जणांवर गुन्हा; आळंदी येथील प्रकार

आळंदी (पुणे), पुढारी वृत्तसेवा: मुलीच्या घरच्यांकडून 16 लाख रुपयांचे 23 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने घेतले, लग्नाची तारीख, वेळ ठरली तशी लग्नाची तयारी, पाहुण्यांची यादी सांगून संपूर्ण खर्च वधुपित्याकडून करून घेतला. मात्र, ऐनवेळी लग्न करायचे नाही म्हणत मुलीची व तिच्या घरच्यांची फसवणूक केली. यावरून आळंदी पोलिस ठाण्यात वरमुलासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 28 मे 2022 ते 15 मे 2023 या कालावधीत आळंदी येथे घडला. याप्रकरणी महिलेने फिर्याद दिली असून, देविदत्त वसंत भारदे, डॉ. वसंत दत्तात्रय भारदे, दोन महिला आरोपी व अमित डहाणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या घरी जात आरोपी देविदत्त व त्याच्या घरच्यांनी लग्न जमवले. फिर्यादी व तिच्या घरच्यांचा विश्वास संपादन करून तिला भेटायला कर्जत येथे बोलावले व तिच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. पुढे फिर्यादीच्या घरच्यांकडून देविदत्तच्या आई-वडिलांनी हुंडा म्हणून 16 लाख रुपयांचे 23 ग्रॅम वजनाचे दागिने बनवून घेतले.

दरम्यान लग्नाची तारीख ठरली. फिर्यादीच्या घरच्यांना सागून लग्नाचा खर्च करायला सांगितला. मात्र, ऐनवेळी आरोपींनी लग्नाला नकार दिला. यावरून पीडित तरुणीने पोलिस ठाण्यात धाव घेत आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असून, आळंदी पोलिस या घटनेचा तपास करत आहे.

Back to top button