पुढारी ऑनलाईन डेस्क : R Ashwin Record : टीम इंडियाचा खेळाडू रविचंद्रन अश्विनने बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत ऐतिहासिक खेळी केली. त्याच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर भारताने दुसरा सामना जिंकून कसोटी मालिकेत यजमान संघाचा क्लीन स्वीप केला. याचबरोबर अश्विनने 34 वर्षे जुना विक्रमही मोडीत काढला असून तो आता 9 व्या क्रमांकावर मैदानात उतरत सर्वाधिक धावांची खेळी करणारा फलंदाज बनला आहे.
अश्विनने (r ashwin record) बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात नाबाद 42 धावांची खेळी केली. यासह विजयी लक्ष्याचा यशस्वीरित्या पाठलाग करताना 9 व्या क्रमांकावर किंवा त्याखालील सर्वात मोठी धावसंख्या करण्याचा विक्रम नोंदवला आहे. यापूर्वी 1988 मध्ये वेस्ट इंडिजच्या विन्स्टन बेंजामिनने पाकिस्तानविरुद्ध नाबाद 40 धावा केल्या होत्या. आता अश्विनने त्याच्यापेक्षा 2 धावा जास्त केल्या आहेत.
याशिवाय चौथ्या डावात अश्विन आणि श्रेयस अय्यर यांच्यात आठव्या विकेटसाठी भारतासाठी दुसरी सर्वोच्च भागीदारी झाली. अय्यर आणि अश्विनने 71 धावा केल्या. त्यांच्यापूर्वी 1932 मध्ये भारताच्या अमर सिंग आणि लाल सिंग यांनी इंग्लंडविरुद्ध 74 धावांची भागिदारी केली होती. त्यानंतर 1985 मध्ये कपिल देव आणि शिवरामकृष्णन यांनी श्रीलंकेविरुद्धत कसोटी सामन्यात आठव्या विकेटसाठी 70 धावांची भागीदारी केली होती.
अश्विनने पहिल्या डावात चार आणि दुसऱ्या डावात दोन असे एकून सहा बळी घेतले. तर फलंदाज म्हणून पहिल्या डावात 12 आणि दुसऱ्या डावात नाबाद 42 धावा केल्या. बांगलादेशच्या फिरकी आक्रमणासमोर भारतीय फलंदाज विकेट गमावत असताना अश्विनने 42 धावांची मॅच विनिंग इनिंग खेळली. या चमकदार कामगिरीसाठी त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. या सामन्यात अश्विनने आणखी एक लक्षवेधी कामगिरी केली. 3000 हून अधिक धावा आणि 400 हून अधिक बळी घेणा-या.खेळाडूंच्या यादीत त्याने प्रवेश केला. या यादीत कपिल देव, शॉन पोलॉक, स्टुअर्ट ब्रॉड, शेन वॉर्न आणि सर रिचर्ड हॅडली यांचा समावेश.
एकूण सामने: 88
विकेट्स: 449
धावा: 3043 धावा
1. मुथय्या मुरलीधरन – 800 विकेट्स
2. शेन वॉर्न – 798 विकेट्स
3. जेम्स अँडरसन – 675 विकेट्स
4. अनिल कुंबळे – 619 विकेट्स
5. स्टुअर्ट ब्रॉड – 566 विकेट्स
6. ग्लेन मॅकग्रा – 563 विकेट्स
7. कोर्टनी वॉल्श – 519 विकेट्स
8. नॅथन लियॉन – 454 विकेट्स
9. रविचंद्रन अश्विन – 449 विकेट्स
10. डेल स्टेन – 439 विकेट्स