Latest

Swiss Open final : पी. व्‍ही. सिंधूची ‘स्‍विस ओपन’वर मोहर

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : भारताची स्‍टार बॅडमिंटनपटू आणि दोनवेळा ऑलिम्‍पिक विजेता पी. व्‍ही. सिंधूने यंदाची स्‍विस ओपन बॅडमिंटन स्‍पर्धा जिंकली आहे. तिने अंतिम सामन्‍यात थायलंडच्‍या चौथ्‍या मानांकित बुसानन ओंगबामरुंगफानशी हिचा २१-१६, २१-८ अशा सलग दोन गेममध्‍ये पराभव केला.

Swiss Open final : सिंधुकडून उत्‍कृष्‍ट खेळाचे प्रदर्शन

स्‍विस ओपन स्‍पर्धेसाठी अंतिम सामना ४९ मिनिटे चालला. सामन्‍यात सुरुवाती पासून सिंधुने आपल्‍या लौकिकाला साजेसा खेळ केला. पहिल्‍या गेममध्‍ये दोघींना पाच गुण होते. यानंतर सलग दोन गुणची कमाई करत सिंधुने आघाडी घेतली. यानंतरही बुसानन हिने पुन्‍हा कमबॅक करत ९ गुण आपल्‍यानावावर करत बरोबरी साधली. यानंतर सिंधुने एक गुणाची आघाडी घेतली. यानंतर उत्‍कृष्‍ट खेळाचे प्रदर्शन करत पहिला गेम २१-१६ असा जिंकला. यानंतर दुसरा गेम तर पूर्ण एकतर्फीच झाला. सिंधुने तब्‍बल ९ गुणांची आघाडी घेतली. अखेर २१-८ असा दुसरा गेमही आपल्‍या नावावर करत स्‍विस ओपन बॅडमिंटन स्‍पर्धेवर आपलं नाव काेरलं.

हेही वाचलं का ?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT