Latest

पुणे: विभागीय आयुक्त डॉ. अनिल रामोड यांना १३ जूनपर्यंत सीबीआय कोठडी

अमृता चौगुले

पुणे, पुढारी वृत्तसेवा: पुण्याचे अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. अनिल रामोड यांना सीबीआय न्यायालयाचे विशेष न्यायाधीश ए. एस. वाघमारे यांनी १३ जूनपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली.

सीबीआयने तपासादरम्यान रामोड यांच्या घर व कार्यालयातून ६ कोटी ६४ लाखांची रोकड हस्तगत केली आहे. याखेरीज त्यांच्या कार्यालयालयात एक सील बंद आयफोन आढळून आला असून तो जप्त करण्यात आला आहे. तक्रादार व आरोपी या दोघांमध्ये झालेले संभाषण रेकॉर्ड झाले आहे. त्यामध्ये आरोपीने पैसे घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याच्या आवाजाचे नमुने घ्यायचे आहे. चौकशीसाठी रामोड हे सहकार्य करत नसून उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. त्यामुळे गुन्ह्याचा अधिक तपस करण्यासाठी सरकारी वकील अभय अरीकर यांनी ५ दिवसांची सीबीआय कोठडी देण्याची मागणी केली. न्यायालयाने ती मान्य करत तीन दिवसांची कोठडी सुनावली. सीबीआयचे अतिरिक्त अधिक्षक आय. बी. पेंढारी यांनी रामोड यांना न्यायालयात हजर केले.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT