Latest

PM Modi : भरडधान्य ‘बाजरी’ला प्रोत्साहन द्या : पंतप्रधान

अविनाश सुतार

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी भारतीय जनता पार्टीच्या संसदीय दलाची महत्वाची बैठक पार पडली. बैठकीत पंतप्रधानांसह (PM Modi)  संरक्षमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह पक्षाचे इतर बडे नेते उपस्थित होते. खासदारांना संबोधित करताना पंतप्रधानांनी आगामी वर्ष २०२३ 'आंतरराष्ट्रीय बाजरी वर्ष' म्हणून साजरा करण्यावर भर दिला आहे, अशी माहिती बैठकीनंतर प्रल्हाद जोशी यांनी दिली.

बाजरीच्या माध्यमातून पोषण अभियानाला प्रोत्साहन दिले जावू शकते. जी-२० संमेलनामुळे लाखो लोक देशात येतील. अशात शक्य असेल तिथे जेवणात त्यांच्यासाठी बाजरीपासून बनवण्यात आलेले पदार्थ ठेवण्याचा आग्रह पंतप्रधानांनी यावेळी केल्याचा जोशी म्हणाले. बाजरीवर गीत, निंबध स्पर्धा तसेच शाळा-महाविद्यालयांमध्ये चर्चेचे आयोजन करावे, अशा सूचना देत ही एक लोकचळवळ बनवण्याचे आवाहन पंतप्रधानांनी (PM Modi) केले.

संयुक्त राष्ट्राकडून २०२३ भरडधान्य आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित

भरड धान्यांना भोजनाचा एक लोकप्रिय पर्याय बनवण्याचे आवाहन करीत भारताच्या आग्रहाखातर संयुक्त राष्ट्राने २०२३ ला भरडधान्य आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केले आहे. भरड धान्याला लोकप्रिय बनवणे देश सेवेसारखे आहे. अशात बाजरीच्या आहाराला प्रोत्साहन देण्यासाठी खासदार त्यांच्याकडून आयोजित केल्या जाणाऱ्या बैठकींमध्ये बाजरीपासून बनवण्यात येणाऱ्या व्यंजनांचा वापर करू शकतील. छोट्या शेतकऱ्यांच्या श्रेणीत येणारे ८५ टक्क्यांहून अधिक शेतकरी मोठ्या प्रमाणात बाजरीचे उत्पादन घेतात. बाजरीच्या वापरात वाढ झाल्याने त्यांना आर्थिक दृष्टया हातभार लागेल, असे मोदी म्हणाले.

या सोबतच कबड्डी सारख्या भारतीय खेळांवरही बैठकीत चर्चा करण्यात आली. भारतीय खेळांवर विशेष लक्ष देण्याचे आवाहन बैठकीतून पंतप्रधानांनी केले. गेल्या काही वर्षांमध्ये क्रीडा स्पर्धांना भाजपने प्राथमिकता दिल्याचे मोदी म्हणाले. अशात जी-२० संमेलनादरम्यान भारतीय संस्कृतीच्या प्रचार-प्रसार करण्याची कुठलीही संधी सोडू नका, असे आवाहन पंतप्रधानांनी भाजप खासदारांना केले.

हेही वाचलंत का ? 

SCROLL FOR NEXT