Latest

Baloch Movie : प्रवीण तरडेंचा खतरनाक लूक, बलोच ‘या’ दिवशी भेटीला

स्वालिया न. शिकलगार

[web_stories title="true" excerpt="false" author="false" date="false" archive_link="true" archive_link_label="" circle_size="150" sharp_corners="false" image_alignment="left" number_of_columns="1" number_of_stories="10" order="DESC" orderby="post_date" view="circles" /]

पुढारी ऑनलाईन डेस्क :

लाखभक्त एक रक्त

सज्ज सक्त कडकडे
आरंभी युद्धाच्या
विजयाचे चौघडे..
सीमेपार लढलेल्या मराठ्यांची विजयगाथा,
'बलोच' ५ मे पासून चित्रपटगृहात.! ???

अशी कॅप्शन मनसे नेते अमेय खोपकर यांनी इन्स्टा लिहित बलोच चित्रपटाच्या रिलीज डेटची घोषणा केलीय. अमेय खोपकर बहुप्रतीक्षित 'बलोच' या चित्रपटाची प्रस्तुती करत आहेत. त्यांनी 'लय भारी', 'येरे येरे पैसा' अशा चित्रपटांची निर्मिती याआधी केली आहे.

अमेय यांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून बलोच ५ मे रोजी रिलीज होणार असल्याचे सांगितले आहे. त्यांनी बलोचचा एक पोस्टर रिलीज केलाय. त्यावर बलोच…सीमापार लढलेल्या मराठ्यांची विजयगाथा असे लिहिले आहे. विश्वगुंज पिक्चर्स आणि कीर्ती वराडकर फिल्म्स यांची प्रस्तुती आहे.

या चित्रपटात प्रवीण विठ्ठल तरडे मुख्य भूमिकेत आहेत. प्रवीण तरडे यांचा खतरनाक लूक या पोस्टरमधून दिसत आहे.

[web_stories title="true" excerpt="true" author="false" date="true" archive_link="true" archive_link_label="" circle_size="150" sharp_corners="false" image_alignment="left" number_of_columns="1" number_of_stories="1" order="DESC" orderby="post_date" view="list" /]

SCROLL FOR NEXT