Latest

Prarthna Behere : अस्सल मराठी दिसतेस, प्रार्थनाची नऊवारी साडी लय भारी (Video)

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : अस्सल मराठमोळं सौंदर्य काय असतं, हे प्रार्थना बेहरेकडूनच शिंकावं. लेटेस्ट फोटोशूटमध्ये प्रार्थनाचा मराठी लूक अप्रतिम आहे. 'पवित्र रिश्ता' या मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या प्रार्थनाने अनेक चित्रपटांमध्येही काम केले आहे. (Prarthna Behere) प्रार्थनाने दिग्दर्शक अभिषेक जावकरसोबत गोव्यात पारंपरिक पद्धतीने लग्न केले. प्रार्थना बेहेरे टीव्ही सीरियल 'पवित्र रिश्ता'मध्ये वैशालीच्या भूमिकेतून प्रसिद्ध झाली होती. माझी तुझी रेशीम गाठ या मालिकेतून ती प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. (Prarthna Behere)

सध्या तिच्या लूकची होतेय. चाहत्यांकडून तर कमेंट्सचा वर्षाव होताना तिच्या इन्स्टा कमेंट बॉक्समध्ये पाहायला मिळतोय. पीच कलरच्या साडीवर प्रार्थनाने ग्रीन कलरचे ब्लाऊज परिधान केले आहे. केसात गजरा, कपाळावर चंद्रकोर टिकली, नाकात नथ असं अस्सल मराठी सौंदर्यात प्रार्थनाने फोटोशूट केलं आहे. तिचा एक व्हिडिओदेखील आहे. ज्यामध्ये ती मराठमोळ्या थाटात दिसतेय.

प्रार्थनाचे इन्स्टाग्रामवर २ मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. नेहमीच सोशल मीडियावर ॲकिटव्ह असणाऱ्या प्रार्थनाने आपले लेटेस्ट फोटोज आणि व्हिडिओज तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला शेअर केले आहेत. या व्हिडिओ आणि फोटोजना खूप सुंदर कमेंट्स पाहायला मिळताहेत. संस्कृती महाराष्ट्रीयन ???, साडीत तू खूपच छान दिसतेस, अतिशय सुंदर रूप हे तुझे अगदी घायाळ करणारी अदा ❤️❤️???, ✍"सौंदर्य हे प्रत्येकातच आहे. सौंदर्य फक्त रूपात नसाव. ते गुणाने ओळखले जाते. सौंदर्य हे अनमोल दिलेलं आहे., आत्ता तू छान दिसतेस बघ, अस्सल मराठी दिसतेस ????❤️❤️❤️, अप्रतिम सुंदर मॅडम ??? अशा कमेंट्स तिच्या चाहत्यांनी केलेल्या दिसतात.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT