Latest

मेळावा मनसेचा, पण प्राजक्ता माळीची चर्चा कशासाठी ?

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : गुढीपाडव्यानिमित्त मनसेचा मेळावा दोन वर्षांनंतर दादरमधील शिवाजी पार्क मैदानात दोन वर्षांनंतर पार पडला. या मेळाव्यात राज ठाकरेंनी आक्रमक हिंदुत्वाची भूमिका मांडली. दरम्यान, या मेळाव्याला मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने हजेरी लावली. त्यामुळे अनेकांना वाटलं की, प्राजक्ता राजकारणात वगैरे प्रवेश करते की काय? सोशल मीडियावर तशी विचारणाही होऊ लागली. त्यामुळे माळी हिने स्पष्टीकरण देत फेसबूकवर पोस्ट लिहिलीय.

आपण राजकारणात गेलो नसून केवळ मेळाव्याला हजेरी लावल्याचे तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय. प्राजक्ताने फेसबूक पोस्टमध्ये म्हटलंय –

'नाही नाही.., कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश केला नाही. ???. काल आयूष्यात पहिल्यांदा राजकीय सभा अनुभवली (खूप दिवसांपासून अनुभवायचीच होती..) ते फक्त तुमच्याबरोबर share करतेय…,इतकाच हेतू?. कलाकार नंतर आधी मी माणूस- सामाजिक प्राणी आहे; त्याच्या समृद्धी करता पण झटायला हवं. म्हणून हा घाट. (आता माझ्या आधार कार्ड वर मुंबईचा पत्ता आहे.) #सर्वांगीणविकास #समग्रजीवन #राजकारण #मुंबई #prajakttamali @?.'

'काल आयुष्यात पहिल्यांदा राजकीय सभा अनुभवली', असंही तिने आपल्या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय. तिने इन्स्टाग्राम पोस्टदेखील लिहून व्हिडिओ शेअर केला आहे. प्राजक्ताच्या या पोस्टवर अनेक सोशल मीडिया युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. 'कौतुक करावं तेवढं कमीच' आहे, असे एका नेटकऱ्याने लिहिलं आहे. तर कसा होता अनुभव, असा प्रश्नही दुसऱ्या युजरने विचारला आहे.

राज ठाकरे म्हणाले- या मेळाव्यात राज ठाकरेंनी (Raj Thackeray) आक्रमक हिंदुत्वाची भूमिका मांडली. तुम्ही जसं राजकारण केलं तसंच समोरचाीही राजकारण करणार. त्यांनी राज्यातील महाविकास आघाडीच्या कारभारावर टीका केली.

SCROLL FOR NEXT