कॉमेडियन भारती सिंहने दिला मुलाला जन्म; पण तिची ‘ही’ इच्छा राहिली अपूर्ण | पुढारी

कॉमेडियन भारती सिंहने दिला मुलाला जन्म; पण तिची 'ही' इच्छा राहिली अपूर्ण

पुढारी ऑनलाईन; कॉमेडियन भारती सिंह ( Bharti Singh ) आणि पती हर्ष लिंबाचिया हे आई-वडील बनले आहेत. ही गुडन्यूज भारतीचा पती हर्ष लिंबाचिया याने सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत दिली. भारतीने नुकतेच एका मुलाला जन्म दिला; पण तिची एक इच्छा अधूरी राहिल्याचे समोर आले आहे.

नुकतेच हर्ष लिंबाचियाने त्याच्या इंन्स्टाग्रावर एक भारतीचा ( Bharti Singh ) आणि स्वत: चा फोटो शेअर केला आहे. हा फोटो भारतीच्या प्रेग्नेंसी दरम्यानचा आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये हर्षने ‘इट्स अ बॉय❤️’ असे म्हटले आहे. यावरून भारतीने नुकतेच एका गोंडस मुलाला जन्म दिल्याची माहिती मिळतेय.

अभिनंदनाचा वर्षाव

हा फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांसह बॉलिवूड स्टार्सनी कॉमेडियन भारती आणि हर्षवर अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत. अभिनेत्री अमृता खानविलकर, अर्जुन बिजलानी, अनिता हसानंदानी आणि राहुल वैद्य यांच्‍यासह अनेक स्टार्सनी चाहत्‍यांनी  दाेघांना भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.

गेल्या काही दिवसांपुर्वी भारतीची डिलिव्हरी झाल्याच्या अफवा सोशल मीडियावर पसरल्या होत्या. भारतीने स्वत: एक मुलाखत घेत याबाबतची माहिती आम्ही लवकरच चाहत्यांना देवू असे म्हटले होते. यावेळी भारतीला तुला मुलगा हवा की, मुलगी हवी असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी भारतीने बिनधास्तपणे मला क्यूट, मेहनती आणि धाडसी मुलगी हवी असे म्हटले होते. सध्या भारतीने एका गोंडस मुलाला जन्म दिल्याने तिची ही इच्छा अपूर्ण राहिली आहे.

भारतीने प्रेग्नेंसीतील अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले हाेते. भारतीने प्रसूतीच्या शेवटच्या दिवसापर्यंत शूट केले हाेते. अगदी शनिवारी देखील तिला शूटिंगच्या सेटवर पाहिले गेले होते.

हेही वाचलंत का? 

( video : viralbhayani, instantbollywood instagram वरून साभार)

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

Back to top button