पुढारी ऑनलाईन: एखादा दिवस तुमच्यासाठी निरूत्साही, खराब गेला तरी त्यानंतरच उगविणारा दिवस हा नवीन असतो. रोजच्या उगविणाऱ्या सूर्याबरोबर, नव्याने येणारा दिवस हा तुमच्यासाठी एक संधी घेऊन येत असतो. तुमच्या आयुष्यातल्या झाल्या गेलेल्या प्रत्येक वाईट, दु:खी गोष्टी विसरून त्या दिवसापासून तुम्ही पुन्हा एकदा नव्याने सुरूवात करू शकता. त्यामुळे प्रत्येक दिवसाची सुरूवात आणि सकाळचे विचारच तुमच्या दिवसभराची दिनचर्या आणि आयुष्याची दिशा (Positive Morning) ठरवत असतात.
दिवसाची सुरूवात ही सकाळी तुम्ही किती झाेपतून जागे हाेता, यावरअसते.आयुर्वेदानुसार सकाळी ब्रह्म मुहूर्तावर उठणं हे तुमच्या आनंदी आणि हेल्दी दिनश्चर्येची सुरूवात असते. ब्रह्म मुहूर्तावर उठणे म्हणजेच सूर्योदयापूर्वी २ तास आधी उठणे(Positive Morning) .
सकाळी उठल्या उठल्या आपल्या दोन्ही हाताचे तळवे जुळवून त्याच्याकडे बघा आणि चेहऱ्यावर स्मित हास्य आणा. यानंतर आपले दोन्ही हाताचे तळवे एकमेकावर चोळून त्याचा डोळ्यांना स्पर्श करा. यानंतर हात जोडून या सुंदर ग्रहावर जिवंत असल्याबद्दल निसर्ग, आई आणि वडीलांप्रती आनंद आणि कृतज्ञता व्यक्त करा.
नकारात्मक विचाराचा प्रभाव घरातील आणि आपल्या सभोवतालच्या वातावरणावरही पडतो. जसा आपण विचार करू तसेच आपल्या सभोवतालचे आणि घरातील वातावरण होते. त्यामुळे सकाळी सकाळी सकारात्मक विचार करा. यामुळे तुमच्या आसपास घडणाऱ्या गोष्टी देखील सकारात्मक (Positive Morning) घडतील.
अर्धा तास मॉर्निंगवॉक आणि अर्धातास साध्या सोप्या श्वासोच्छवासाचे तंत्र, ध्यान, सूर्यनमस्काराने तुमच्या दिवसाची सुरुवात करा. म्हणजे तुमच्या दिनश्चर्येची सुरूवात देखील उत्साही आणि आनंदी होईल. तसेच दिवसभर तुम्ही फ्रेश राहाल. तसेच याचा तुमच्या मानसिक आराेग्यावरही सकारात्मक परिणाम हाेईल.
तुम्ही जे खातात त्याचा परिणाम तुमच्या शरीरावरच नाही तर मनाच्या आरोग्यावरही होतो. एकवेळ तुम्ही दुपारचे जेवण टाळा;पण सकाळचा नास्टा (ब्रेकफास्ट) चुकवू नका, एवढा सोप्या शब्दांमध्ये तुम्हाला सकाळच्या ब्रेकफास्टचे महत्त्व डॉक्टर आणि आहारतज्ज्ञ सांगत आले आहेत. त्यामुळे ब्रेकफास्ट टाळू नका. कारण तोच आपल्या दिवस अधिक ऊर्जा करण्यास मदत करतो. तसेच दिवसभर आपला मूडही चांगला ठेवतो.