Latest

pune metro : पीएम मोदींच्या हस्ते पुणे मेट्रोचे उद्घाटन; आजपासून मेट्रो सर्वसामान्यांसाठी खुली

backup backup

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पोलिसांच्या वॉकी टॉकीची रिंग वाजली… पीएम कृषीमहाविद्यालयातून निघालेत, पुढील 5 ते 10 मिनिटांत गरवारे कॉलेजजवळ पोहचतील, असा अलर्ट आला आणि काही वेळातच पंतप्रधानांच्या वाहनांचा ताफा दिसू लागला. बघता-बघाता एसपीजी कामांडोंच्या ताफा असलेल्या हाय सिक्युरिटी गाड्यांच्या ताफ्यात पंतप्रधान गरवारे मेट्रो स्थानक येथे पोहचले. अन काही मिनिटांतच त्यांच्या हस्ते पुणे मेट्रोचे उदघाटन झाले. त्यानंतर आजपासून मेट्रो सर्वसामान्यांसाठी खुली झाली.

गरवारे मेट्रो स्थानकाजवळ गाडीतून उतरून आजूबाजूच्या सर्वांना हात दाखवत, नमस्कार करत पंतप्रधानांनी गरवारे मेट्रो स्थानकात प्रवेश केला. पंतप्रधानांच्या स्वागतासाठी गरवारे मेट्रो स्थानक सज्ज होते. मेट्रोचे अधिकारी, महापौर व अन्य राजकीय मंडळींनी पंतप्रधानांचे यावेळी स्वागत केले. त्यानंतर गरवारे मेट्रो स्थानकाची पाहणी करत पंतप्रधानांनी गरवारे कॉलेज मेट्रो स्टेशन ते आनंद नगर मेट्रो स्टेशन दरम्यान प्रवास केला.

मेट्रो स्थानक सजले

गरवारे कॉलेज मेट्रो स्थानक पंतप्रधानांच्या स्वागतासाठी सजवण्यात आले होते. आकर्षक झेंडूच्या फुलांच्या माळा, व्हर्टिकल गार्डन, रांगोळ्यांच्या पायघड्या, मेट्रोची माहिती देणारे फलक, मेट्रोची पर्यावरण पूरक फिडर सर्विस देण्यासाठी सज्ज असलेल्या इलेक्ट्रिक गाड्या, त्यामुळे गरवारे कॉलेज मेट्रो स्थानकाला आज वेगळेच स्वरूप आले होते.

बघ्यांची गर्दी

परिसरात मोदींना पाहण्यासाठी आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांची रस्त्यांवर काही ठिकाणी गर्दी झाल्याचे दिसते. तर काही ठिकाणी नागरिक आपल्या इमारतीच्या खिडकी मधून पाहताना दिसले.

गरवारे कॉलेज परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेसाठी गरवारे कॉलेज परिसरात पोलिसांसह विविध सुरक्षा यंत्रणांचा कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या परिसरातून कोणालाही प्रवेश करण्यास परवानगी नव्हती. येणा जाणारा प्रत्येकाला पायी चालणाऱ्याला सुद्धा या परिसरात प्रवेश बंद होता. यामुळे पुणेकर नागरिक नाराज झाले.

हे ही वाचलं का ?

SCROLL FOR NEXT