Latest

PM Kisan 13th Installment : उद्या जमा होणार किसान सन्मान योजनेच्या १३ व्या हप्त्याचे पैसे!

मोहन कारंडे

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी पीएम किसान सन्मान योजनेचा निधी जारी केला जाणार आहे. कर्नाटकमधील बेळगाव येथे होणाऱ्या कार्यक्रमादरम्यान किसान सन्मान योजनेच्या १३ व्या टप्प्यातील १६ हजार कोटींच्या अनुदानाचे वितरण केले जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

कोरोना संकटात शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान योजना सुरू झाली असून आतापर्यंत १२ हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा झाले आहेत. १३ व्या हप्त्यातील १६ हजार कोटींच्या वितरणाचा प्रारंभ बेळगावातून होणार आहे. देशभरातील आठ कोटी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात लाभाची रक्कम थेट जमा केली जाईल. पीएम किसान सन्मान योजनेचा हा १३ वा हप्ता आहे. १ डिसेंबर २०१८ पासून ही योजना सुरू करण्यात आली होती. कमी क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना योजनेच्या माध्यमातून वर्षाला सहा हजार रुपयांची मदत दिली जाते. दर चार महिन्याला एकदा अशा तीन हप्त्यात हा निधी दिला जातो. बारा हप्ते आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत. तेरावा हप्त्याचे १६ हजार कोटी रूपये जमा करण्याच्या योजनेचा बेळगावातून प्रारंभ होणार आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT