Google VS AI Chatbot : चांगली पावभाजी कुठे मिळेल? कोण देईल योग्य उत्तर गुगल की चॅटबॉट? | पुढारी

Google VS AI Chatbot : चांगली पावभाजी कुठे मिळेल? कोण देईल योग्य उत्तर गुगल की चॅटबॉट?

पुढारी ऑनलाइन डेस्क : तुम्हाला पावभाजी खायची आहे आणि ती ऑनलाइन मागवायची असेल तर चांगली पावभाजी कुठे मिळेल याचे योग्य उत्तर कोण देईल गुगल सर्च की मायक्रोसॉफ्टचे बिंग एआय चॅटबोट. यावर आर्टिफिशिअल इंटेलिजन्स क्षेत्रात काम करणा-या टेक क्षेत्रातील संशोधकांनी चाचणी घेतली. चला तर पाहू या Google VS AI Chatbot दोन्ही पैकी कोण तुम्हाला चविष्ट पावभाजी शोधण्यात जास्त चांगली मदत करेल. बिझनेस टुडे या वेबसाइटने याचे वृत्त दिले आहे.

आपण तंत्रज्ञानाच्या युगात जगत आहोत. तंत्रज्ञान क्षेत्रात गुगल सर्वात आघाडीची कंपनी आहे. आपण कोणतीही गोष्ट शोधायची असेल तर गुगलवर जाऊन लगेच सर्च करतो. त्यामुळे आपण गुगल फ्रेंडली झालो आहोत. मात्र, तंत्रज्ञानाच्या युगात झपाट्याने बदल होत असतात. नवीन तंत्रज्ञान येत असते. जुने तंत्रज्ञान जात असते. त्यामुळे सध्या मायक्रोसॉफ्टने विकसित केलेल्या चॅटबॉटची जास्त चर्चा आहे. तसेच गुगल विरुद्ध चॅटबॉट असेही चित्र सध्या तंत्रज्ञानाच्या विश्वात पाहायला मिळत आहेत. त्यामुळेच वेगवेगळ्या प्रश्नांची कोण जास्त चांगली उत्तरे देतो. यावर सातत्याने प्रयोग किंवा चाचण्या केल्या जातात. त्यापैकीच पावभाजी ही एक लोकप्रिय भारतीय डिश आहे. आणि आपल्याला जेव्हा चांगली पावभाजी कुठे मिळेल हे ऑनलाइन शोधायचे असते. तेव्हा गुगल सर्च आणि एआय चॅटबॉट Google Search VS AI Chatbot वेगवेगळ्या प्रकारे उत्तरे देतात.

जेव्हा चॅटबॉटला विचारले…

टेक टुडेच्या आयुष आयलावाडीला यांनी याबाबत माहिती देताना सांगितले, जेव्हा आम्ही Google Search ला मला पावभाजी खायचे आहे असे विचारता तेव्हा सर्च इंजिन त्या भागातील रेस्टॉरंट्स आणि स्ट्रीट फूड विक्रेत्यांची यादी दाखवतो. परिणामांमद्ये रेस्टॉरंटच्या वेबसाइट्स, ग्राहकांच्या टिप्पण्या आणि ते नेमके कुठे आहे याचे नकाशे दाखवतो. तसेच Googl डिशबाबत अधिक तपशीलांसह अन्य लिंकही दाखवतो.

Google VS AI Chatbot : जेव्हा चॅटबॉटला विचारले…

पुढे त्यांनी सांगितले, याउलट आम्ही Bing AI चॅटबॉटला पावभाजीसाठी विचारले, तेव्हा त्याने वेगळा दृष्टिकोन घेतला. जवळपासच्या पावभाजी सेंटर्सची यादी तयार करण्याऐवजी, पावभाजीचे मूळ आणि अर्थ सांगून बिंग सुरू झाले. त्यात डिशचा संक्षिप्त इतिहास, त्यातील घटक आणि तयारी याबद्दल काही माहिती दिली. मग बिंगने आम्हाला डिश ऑनलाइन ऑर्डर करायची आहे का किंवा ते सर्व्ह करणारे जवळपासचे रेस्टॉरंट शोधायचे आहे का, असे विचारले. जेव्हा आम्ही ऑनलाइन ऑर्डर करण्याचा पर्याय निवडला, तेव्हा Bing ने प्रत्येक सेवेबद्दल काही माहितीसह पावभाजी ऑफर करणार्‍या ऑनलाइन खाद्य वितरण सेवांची यादी तयार केली.

एकंदरीत, आम्हाला आढळले की Google Search आणि Bing AI चॅटबॉट दोन्ही पावभाजीबद्दल माहिती देण्यासाठी प्रभावी आहेत. तथापि, आमच्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी दोन्ही सेवांनी भिन्न दृष्टिकोन घेतला. Google ने आम्हाला जवळपासच्या रेस्टॉरंट्सची सूची प्रदान करण्यावर लक्ष केंद्रित केले, तर Bing ने डिशचा इतिहास आणि घटक स्पष्ट करून अधिक शैक्षणिक दृष्टीकोन घेतला.

पावभाजीचा प्रश्न बाजूला ठेऊन, Bing चा AI-आधारित चॅटबॉट गुगल सर्चपेक्षा प्रति क्वेरी जास्त महाग असण्याची शक्यता आहे, ज्याचा परिणाम अशा तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करू पाहणाऱ्या व्यवसायांवर होऊ शकतो, असे या एकंदर पाहणीत आढळले.

हे ही वाचा :

Artificial Intelligence: ChatGPT ने चेहरा मोहरा बदलला, अमेरिका चीनसह जगातील स्पर्धा झाली तीव्र

Artificial Intelligence : आता ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ शोधणार चक्क एलियन्स !

Artificial Intelligence : आर्टिफिशियल इंटेलिजन्सला चालना देण्यासाठी विशेष केंद्र- अर्थमंत्री निर्मला सीतारामण

Back to top button