Latest

Petrol-Diesel prices today : सलग चार दिवसांच्या वाढीनंतर इंधन दर जैसे थे

नंदू लटके

सलग चार दिवस इंधन दरात वाढ केल्यानंतर सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी दरवाढीला ब्रेक दिला. विशेष म्हणजे जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या दराने मोठी उसळी घेतली असून क्रूड तेलाचे प्रति बॅरलचे दर 86 डॉलर्सच्या आसपास पोहोचले आहेत. ( Petrol-Diesel prices today) सध्या मुंबईतील पेट्रोलचे प्रति लिटरचे दर 111.77 रुपयांच्या तर डिझेलचे दर 102.52 रुपयांच्या सर्वकालीन उच्चांकी स्तरावर आहेत.

जागतिक बाजारपेठेत इंधन दराचा भडका उडाल्याच्या पार्श्वभूमीवर तेल कंपन्यांनी अलिकडील काळात सातत्याने पेट्रोल-डिझेल दरात वाढ चालविलेली आहे. गेल्या सलग चार दिवसांत पेट्रोल-डिझेलचे दर वाढविण्यात आले होते. त्यानंतर सोमवारी दरवाढीला विश्रांती देण्यात आली आहे.

( Petrol-Diesel prices today) मुंबईतील दर उच्चांकी स्तरावर

दिल्लीमध्ये पेट्रोलचे लिटरचे दर 105.84 रुपयांवर असून डिझेलचे दर 94.57 रुपयांवर आहेत. कोलकाता आणि चेन्नई येथे पेट्रोल क्रमशः 106.43 रुपयांवर तर 103.01 रुपयांवर स्थिर  डिझेल क्रमशः 97.68 आणि 98.92 रुपयांवर स्थिर आहे. सध्या मुंबईतील पेट्रोलचे प्रति लिटरचे दर 111.77 रुपयांच्या तर डिझेलचे दर 102.52 रुपयांच्या सर्वकालीन उच्चांकी स्तरावर आहेत.

विमानाचे इंधन अर्थात एटीएफच्या तुलनेत साध्या पेट्रोल, लिटरचे दर 33 टक्क्यांनी जास्त आहेत. दिल्लीमध्ये एटीएफचे दर 79 हजार 20 रुपये प्रति किलोलिटर या दराने विकले जात आहे. लिटरच्या हिशेबाने विचार केला तर हा दर 79 रुपये इतका होता. मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या दुर्गम भागात पेट्रोल-डिझेल आणखी महाग दराने मिळत आहे. राजस्थानमधील गंगानगर येथे पेट्रोल 117.86 रुपयांवर पोहोचले असून डिझेल 105.95 रुपयांवर पोहोचले आहे.

हेही वाचलं का?

SCROLL FOR NEXT