Latest

Petrol, diesel prices hiked : मुंबईत पेट्रोल १०९ तर दिल्‍लीत १०३ रुपयांवर

नंदू लटके

सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांकडून इंधन दरवाढीचा सपाटा सुरुच असून, ( Petrol, diesel prices hiked ) देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये पेट्रोलचे प्रति लिटरचे दर १०८.९६ रुपयांवर पोहोचले आहेत. दुसरीकडे दिल्लीमध्ये हेच दर १०२.९४ रुपयांवर गेले आहेत. ( Petrol, diesel prices hiked ) इंधन दरवाढीमुळे आगामी काळात महागाईचा मोठा भडका उडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अलिकडेच तेल कंपन्यांनी घरगुती वापराच्या पीएनजी तसेच वाहनांसाठी वापरल्या जाणार्‍या सीएनजी वायूच्याही दरात मोठी वाढ केली होती.

कच्च्या तेलाचे दर ८२ डॉलर्स प्रतिबॅरल

जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर ८२ डॉलर्स प्रतिबॅरलच्या वर गेले आहेत. दुसरीकडे डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सुरु असल्याने तेल कंपन्यांवरील क्रूड तेलाच्या आयात दरावरील दबाव वाढला आहे. तेल कंपन्यांकडून सलग दुसर्‍या दिवशी पेट्रोल आणि डिझेल दरात वाढ करण्यात आली आहे. पेट्रोल दरात झालेली वाढ ३० पैशांची असून डिझेल दरातील वाढ ३५ पैशांची आहे.

मुंबई आणि दिल्ली या शहरांमधील डिझेलचे दर क्रमशः ९९.१७ आणि ९१.४२ रुपयांवर गेले आहेत. अन्य महानगरांचा विचार केला तर तामिळनाडूतील चेन्नई येथे पेट्रोल १००.४९ रुपयांवर तर डिझेल ९५.९३ रुपयांवर गेले आहे. दुसरीकडे प. बंगालमध्‍ये कोलकाता येथे प्रति लिटर पेट्रोल १०३.६५ तर डिझेल ९४.५३ रुपये मोजावे लागत आहेत.

हेही वाचलं का?

SCROLL FOR NEXT