Latest

राज ठाकरेंविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यासाठी याचिका दाखल

अविनाश सुतार

मुंबई : पुढारी ऑनलाईन : राज्यातील मशिदींवरील भोंगे काढण्यासाठी रान पेटवणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण राज ठाकरे यांच्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्या, अशी मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात आज ( दि.९)) दाखल करण्यात आली आहे. इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी त्यांचे वकील आर. एन. कछवे यांच्या माध्यमातून ही याचिका दाखल केली आहे.

राज्यातील मशिदींवरील भोंगे काढण्यासाठी आणि मशिदींसमोर हनुमान चालिसा म्हणण्यासाठी राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना आदेश दिले होते. याबाबत त्यांनी जाहीर सभेत चिथावणीखोर आणि प्रक्षोभक वक्तव्य केले होते. त्य़ामुळे महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न झाला होता, असा आरोप या याचिकेत करण्यात आला आहे. न्यायमूर्ती ए. के. मेनन आणि न्यायमूर्ती नितीन बोरकर यांच्या सुट्टीकालीन न्यायालयापुढे ही याचिका सादर करण्यात आली. या याचिकेवरील सुनावणीसाठी त्यांना तारीख देण्यात येईल, असे न्यायालयाने कळवले आहे.

हेही वाचलंत का ? 

SCROLL FOR NEXT