Latest

Pathaan: ‘त्यांना’ अभिनेत्रींचे कपडे बघण्यासाठी वेळ मिळतो, नेत्यांवर स्वरा भास्करचा निशाणा

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'पठाण'च्या 'बेशरम रंग' या पहिल्या गाण्यात बिकिनीच्या रंगाने दीपिका पदुकोणला ट्रोल तर केलं जातचं आहे शिवाय आता बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने नेत्यांवर टीका केलीय. (Pathaan) स्वरा भास्करने मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांच्यावरही निशाणा साधलाय. अभिनेत्रींचे कपडे बघायला वेळ कसा मिळाला, असे म्हणत स्वराने तीव्र संताप व्यक्त केला आहे. (Pathaan)

स्वराचा निशाणा

स्वरा भास्करने सोशल मीडियावर एका वृत्ताचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे, ज्यामध्ये मध्य प्रदेश सरकारचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांच्या वक्तव्याचा उल्लेख आहे. खरे तर नरोत्तम मिश्रा यांनी पठाणच्या भगव्या रंगाच्या बिकिनी आणि बेशरम रंग या गाण्यातील काही दृश्यांवर आक्षेप घेतला होता. स्वरा भास्करने लिहिले, 'आपल्या देशातील सत्ताधारी नेत्यांना भेटा. अभिनेत्रींचे कपडे बघायला वेळ कसा मिळाला कुणास ठाऊक?

स्वराने मीडियावरही ताशेरे ओढले

नरोत्तम मिश्रा यांनी बुधवारी (१४ डिसेंबर) या प्रकरणी निवेदन जारी करून म्हटले की, बेशरम रंग हे गाणे भ्रष्ट मानसिकतेने चित्रित करण्यात आले आहे. त्याचबरोबर स्वरा भास्करने सोशल मीडियावर होत असलेल्या ट्रोलिंगबाबत मीडियाचाही समाचार घेतला. एका ट्विटर युजरने लिहिले की, 'गुन्हेगार आता मंत्रालयात सामील होत आहेत. पण ही बातमी नाही. या यात्रेत अर्थतज्ज्ञ सामील होत आहेत. या ट्विटचा हवाला देत स्वरा भास्करने लिहिले की, 'दुसरी बातमी म्हणजे आयटम नंबरची नायिका कोणत्या रंगाचे कपडे घालते?' हेदेखील पाहिले जाते.

चित्रपट निर्माते ओनीर यांनीही आपले मत मांडले

या प्रकरणातील वादावर चित्रपट निर्माते ओनीर यांनीही नाराजी व्यक्त केली. 'पठाण'च्या 'बेशरम रंग' या गाण्याला ट्रोल करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका ट्विटर यूजरच्या पोस्टचे स्क्रीनशॉट त्याने शेअर केले आहेत. खरं तर, युजरने लिहिले की, 'काही रुपयांसाठी पुरुष आपल्या पत्नीचा सार्वजनिक छळ कसा करू देऊ शकतो? तो कोणत्या प्रकारचा नवरा आहे?' यावर ओनीरने लिहिले की, 'ही खूप वाईट मानसिकता आहे. जिथे आजही पत्नीला पतीची गुलाम समजली जाते. असा विचार फक्त वाईट मानसिकता असलेले लोकच करू शकतात.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT