

पुढारी ऑनलाईन डेस्क : "हा मोर्चा महाराष्ट्रप्रेमींचा आहे. राज्यातील विरोधी पक्षाचा हा मोर्चा असं म्हणायला आम्ही तयार नाही. ज्या प्रकारे महाराष्ट्राच्या दैवतांचा अवमान सुरु आहे. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, ज्योतीबा फुले, सावित्रीबाई फुले यांचा जो अपमान सुरु आहे. तर दुसऱ्या बाजुला कर्नाटकचे बोम्मई सीमाप्रश्नाबाबत फुरफुरत आहेत. अशी अनेक विषय आहेत. महाराष्ट्रातील उद्योग खेचून दुसरीकडे पळविले जात आहेत. हा महाराष्ट्रावर अन्याय, अत्याचार होत आहे. तरीही सरकार गप्प बसत आहे. त्यामुळे समस्त महाराष्ट्र प्रेमींना आवाहन केले आहे की, 'या मोर्चात महाराष्ट्रासाठी या'. जर हे सरकार महाराष्ट्राचे असेल तर महाराष्ट्रप्रेमींना विरेध करत असेल तर महाराष्ट्रात महाराष्ट्र द्रोही सरकर स्थापन झाले आहे. असं विधान खासदार संजय राऊत यांनी केले आहे. (Sanjay Raut News)
महाविकास आघाडीकडून 17 डिसेंबरला मुंबईत विराट मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत बोलत होते. ते म्हणाले, "खरतर सरकारमधील लोकांनी या मोर्चामध्ये सामील झालं पाहिजे. हा मोर्चा महाराष्ट्रासाठी आहे. मोर्चा जाहीर झाला आहे व तो होईल. संयुक्त महाराष्ट्राच्या काळात महाराष्ट्र प्रेमींचे अशा प्रकारचे मोर्चे झालेले आहेत. ते पुढे असेही म्हणाले की, "आम्ही काय करत आहे? आम्ही कोणतेही अघटनाबाह्य काम करत नाही. अलोकशाही पद्धतीने बसलेले सरकार लोकशाही प्रक्रियेला विरोध करत आहे. आम्ही लोकशाही मार्गाने चाललो आहोत. त्याच मार्गाने जाऊ आणि त्याच मार्गाने सत्तेवरुन खेचू.
चित्रा वाघ यांनी केलेल्या टिकेवर बोलताना म्हणाले, "डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म हा महाराष्ट्रात झाला. या भारतीय जनता पक्षाच्या काही लोकांचे मेंदू हे किड्यामुंग्याचे मेंदू आहेत. असे मला दुर्दैवाने वाटत आहे. घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्राचे सुपुत्र नाही आहेत का? हा माझा प्रश्न आहे. ते महाराष्ट्राचे सुपूत्र आहेत. ते आमचे आहेत. त्यांचा जन्म देशातचं झाला आहे. त्यांचा जन्म मध्यप्रदेशमधील महु येथे झाला. महाराष्ट्र कधी राज्य झालं. मध्यप्रदेश, बिहार राज्य कधी झालं याचा अभ्यास करा. भाजपमधील लोकांना स्वतःची बुद्धी नाही तर ती उसनी घेतली आहे. ते कळत आहे. त्यांच्या जीभेवर काय, पोटात काय, मेंदूत काय समजत आहे.
हे लोक छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, ज्योतीबा फुले, सावित्रीबाई फुले यांचा अपमान करत आहेत. आणि आम्हाला अक्कल शिकवत आहेत. आंबेडकर आपल्या देशात जन्मले हे भारताचं भाग्य. ते महाराष्ट्राचे सुपूत्र आहेत त्याहून मोठे भाग्य आहे. मात्र, त्यांना वाटत नसेल की, 'हे भाग्य आहे' म्हणूनच ते अशी टिका करत आहेत. हे सरकार लाचार आहे. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, ज्योतीबा फुले, सावित्रीबाई फुले यांचा अपमान झाला तरी गप्प आहेत.
हेही वाचा