Latest

पासवर्ड मॅनेजिंग अॅप्स Lastpass झाले हॅक, सोर्स कोड डेटा चोरला

दीपक दि. भांदिगरे

पुढारी डेस्क : जर तुम्ही पासवर्ड मॅनेजिंग अॅप्स वापरत असाल तर तुम्ही कदाचित LastPass बद्दल ऐकले असेल. हे जगातील सर्वात जास्त मागणी असणारे पासवर्ड मॅनेजिंग अॅप आहे. मात्र, पासवर्डसाठी सुरक्षित मानले जाणारे हे अॅप्लिकेशनच हॅक करण्यात आले आहे. यामुळे यातील source code आणि महत्वाची माहिती चोरली गेली आहे.

दरम्यान, कंपनीने एका ब्लॉग पोस्टमध्ये याची माहिती दिली आहे. ३ कोटी ३० लाख यूजर्स असलेल्या LastPass अॅप्लिकेशनमध्ये हल्ली काही आक्षेपार्ह बाबी दिसून आल्या. या प्रकरणी तपास सुरु असल्याचे सदर कंपनीने म्हटले आहे.

दरम्यान, LastPass ने सायबर हल्ल्याबाबत सविस्तर माहिती दिलेली नाही. यामुळे हॅकर्स कंपनीच्या खात्यापर्यंत कसे पोहोचले आणि कोणता source code चोरीला गेला हे अद्याप स्पष्ट झालेली नाही. LastPass हे पासवर्ड मॅनेजमेंट प्लॅटफॉर्म आहे. ज्याचा वापर सर्व ऑनलाइन लॉगिन क्रेडेन्शियल्स (usernames and passwords) एका ठिकाणी सुरक्षितपणे साठवण्यासाठी केला जातो.

LastPass एक एक पासवर्ड मॅनेजर आहे जो एनक्रिप्टेड पासवर्ड ऑनलाइन स्टोअर करतो. LastPass चे सुधारित व्हर्जन वेब इंटरफेससह येते, पण त्यात अनेक स्मार्टफोनसाठी विविध वेब ब्राउझर आणि अॅप्ससाठी प्लगइनचादेखील समावेश आहे.

 हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT