Bank holidays September 2022 : सप्टेंबरमध्ये तब्बल १३ दिवस बॅंकांना सुट्टी

 September Bank Holidays
 September Bank Holidays

पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑगस्ट महिन्यात १३ दिवस बॅंकांना सुट्टी होती. ऑगस्ट महिन्याप्रमाणेच सप्टेंबर महिन्यात देखील तब्बल १३ दिवस सुट्टी असणार आहे. सप्टेंबर महिन्यात विवीध सण-उत्सवामुळे सुट्टी असणार आहे. सप्टेंबरला अवघे काहीच दिवस राहिले आहेत. पुढल्या महिन्यात बॅंकांच्या कामांचे नियोजन करत असाल तर बॅंकांना सुट्टी (Bank holidays September 2022) कधी आहे हे नक्की पहा. जेणेकरुन तुमचा वेळ वाचेल.

भारतीय रिझर्व्ह बॅंकेच्या कॅलेंडरनुसार  सप्टेंबर महिन्यात १३ सुट्टया  असणार आहेत. या तेरा दिवसांत साप्ताहिक सुट्ट्यांचा समावेश आहे. जर का तुम्हाला या महिन्यात बॅंकेची काही कामे करायची असतील तर ही यादी जरुर पाहा. आणि मग बॅंकेची कामे करायला सुरुवात करा. बॅंकेचे कामकाज हे महिन्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या शनिवारी बंद असते. त्याचबरोबर रविवारीही सुट्टी असते. यांचाही समावेश या तेरा सुट्टयांमध्ये आहे.

Bank holidays September 2022 : भारतीय रिझर्व्ह बॅंकेच्या कॅलेंडरनुसार यादी

१ सप्टेंबर – गणेश चतुर्थीमुळे पणजीमध्ये बॅंक बंद राहील.

४ सप्टेंबर – महिन्याचा पहिला रविवार

६ सप्टेंबर – कर्म पुजा सण (रांचीमध्ये बँक बंद राहील).

७ सप्टेंबर – ओणम सण (कोची आणि तिरुवनंतपूरममध्ये बँक बंद राहील)

८ सप्टेंबर – या दिवशी गंगटोकमध्ये बँक राहील कारण तिथे या दिवशी इंद्रयात्रा आहे.

१०  सप्टेंबर – कोची आणि तिरुवनंतपूरममध्ये श्री नारायण गुरु जयंती आणि महिन्याचा दुसरा शनिवार असल्याने सुट्टी आहे.

११ सप्टेंबर – महिन्याचा दुसरा रविवार.

१८ सप्टेंबर – महिन्याचा तिसरा रविवार.

२१  सप्टेंबर – श्री नारायण गुरु समाधी दिवस असल्याने कोची आणि तिरुवनंतपूरममध्ये बॅंक बंद राहील.

२४ सप्टेंबर – महिन्याचा चौथा शनिवार.

२५ सप्टेंबर – महिन्याचा चौथा रविवार.

२६  सप्टेंबर – इंफाळ आणि जयपूरमध्ये मेरा चौरेन हौबा/ नवरात्री निमित्त स्थापना.

गंगटोकमध्ये 9 ते 11 सप्टेंबर सलग 3 दिवस  कोणतीही बॅंक चालू राहणार नाही. कारण 9 तारखेला इंद्रयात्रा, 11 तारखेला इंद्रयात्रा आहे.  अशा परिस्थितीत येथील अडचणींना सामोरे जावे लागू शकते.

हेही वाचलंत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news