Latest

Passenger Misbehaved In Indigo Flight : मद्यधुंद प्रवाशांचा धिंगाणा सुरूच; IndiGo विमानातील आणखी एक गैरप्रकार समोर

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क : विमानातील गैरप्रकाराच्या घटना थांबता थांबत नाहीत. कित्येक दिवसांपासून अनेक विमान प्रवासात मद्यधुंद प्रवाशांचा धिंगाणा सुरूच आहे. आता पुन्‍हा एकदा बंगळूरला जाणाऱ्या फ्लाईटमध्ये मद्यधुंद प्रवाशाने विमानातील क्रूसोबत पुन्हा गैरवर्तन केल्याची घटना घडली आहे. या प्रवाशाने इंडिगो विमानातील क्रूसोबत इशारे करत, गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेनंतर कंपनीने कारवाई केल्याचे वृत्त 'एएनआय'ने दिले आहे. (Passenger Misbehaved In Indigo Flight)

जयपूरहून बंगळूरला जाणाऱ्या फ्लाइट 6E 556 मध्ये ही गैरवर्तनाची घटना घडली. कंपनीने संबंधित प्रवाशावर कायदेशीर कारवाई केली आहे. प्रवाशाला स्थानिक कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या अधिकार्‍यांकडे सुपूर्द करण्यात आले आहे, असे विमान कंपनी इंडिगो कंपनीने म्हटले आहे. (Passenger Misbehaved In Indigo Flight)

अलीकडील एका घटनेत, राजस्थानच्या सीकर जिल्ह्यातील रणधीर सिंग नावाच्या ३३ वर्षीय व्यक्तीला गैरवर्तनप्रकरणी ताब्यात घेण्यात आले होते. एअर होस्टेसशी गैरवर्तन केल्याबद्दल संबंधित व्यक्तीवर ही कारवाई केली होती.  ही घटना देखील जयपूरहून बेंगळुरला जाणाऱ्या इंडिगो फ्लाइट 6E556 मध्ये घडली होती, असे 'टाईम्स नाउ'ने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

हेही वाचा:
SCROLL FOR NEXT