Latest

Security Breach In Parliament: रोजंदारी कामगार ते ‘एमफिल’धारक विद्यार्थिनी : जाणून घ्या संसद घुसखोरी प्रकरणातील आरोपींविषयी…

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : संसदेच्‍या हिवाळी अधिवेशनादरम्यान बुधवार, १३ डिसेंबर रोजी तरुणांनी लोकसभेत घुसखोरी केली. संसदेवर 2001 मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा 22 वा स्मृती दिन बुधवारी होता. याच दिवशी धक्‍कादायक प्रकाराने संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी चव्हाट्यावर आल्याने देशभरात एकच खळबळ माजली आहे. या प्रकरणी दोघांना तत्‍काळ जेरबंद करण्‍यात आले. (Parliament security breach) जाणून घेऊया संसदेत घुसखोरी प्रकरणातील चार आरोपींविषयी…. (Security Breach In Parliament)

'एमफिल'धारक नीलम नेट परीक्षाही झाली आहे उत्तीर्ण

प्रेक्षक गॅलरीतून लोकसभा सभागृहात तरुणाने उडी घेतली. याचवेळी संसदेबाहेर सरकारविरोधात घोषणा देणार्‍या ४२ वर्षीय नीलमलाही पोलिसांनी ताब्‍यात घेतले. उचाना येथील घासो खुर्द गावातील नीलम हिसार येथे हरियाणा सिव्हिल सर्व्हिसेसच्या तयारीसाठी राहत होती. बीए, एमए, बीएड, एम.एड, स्टेट, सीटीईटी, एमफिल असे शिक्षण घेतले आहे. नेट परीक्षाही तिने उत्तीर्ण केली आहे. नीलमचे वडील मिठाईचे व्यापारी आहेत. रामनरेश आणि त्यांचे भाऊ दूध विक्रीचा व्‍यवसाय करतात काम करतात.शेतकरी आंदोलन आणि इतर धरणे आणि निदर्शनांमध्येही ती सक्रिय असते. प्रोग्रेसिव्ह आझाद युथ ऑर्गनायझेशन या संघटनेची ती संस्‍थापक सदस्‍यही आहे. काँग्रेसचा प्रचार करतानाचा तिचा एक व्हिडिओही व्हायरल झाला होता. 25 नोव्हेंबर रोजी ती पुढील शिक्षणासाठी दिल्‍लीला जात असल्‍याचे तिने आईला सांगितले होते, अशी. माहिती पोलिसांनी दिली. सरकार आपल्यावर दडपशाही करत आहे. आमच्या हक्कासाठी आवाज उठवल्यावर आम्हाला मारहाण करून तुरुंगात टाकले जाते. आम्ही कोणत्याही संघटनेशी संबंधित नाही, असा दावा नीलमने माध्‍यमांशी बोलताना केला होता. (Security Breach In Parliament)

मनोरंजन डी आहे अभियंता, वडील म्‍हणाले," चुकला असेल तर फाशी द्या"

संसदेतील घुसखोरी प्रकरणातील आरोप मनोरंजन डी (३५) हा अभियंता असून तो अविवाहित आहे. त्‍याचे वडील देवराज हे शेतकरी आहे. घटनेची माहिती मिळाल्‍यानंतर माध्‍यमांशी बोलताना त्‍यांनी सांगितले की, या घटनेमध्‍ये मनोरंजनचा सहभाग असल्‍याची माहिती मिळाल्‍यानंतर मला धक्का बसला. मी या घटनेचा निषेध करतो, कोणीही असे करू नये. चार दिवसांपूर्वी मनोरंजन बेंगळुरूला घरी निघून गेला होता. मित्र आणि नातेवाईकांनी त्यांना दिल्लीत घडलेल्या घटनेची माहिती दिली. मनोरंजनाने काही चुकीचे केले असेल तर तो माझा मुलगा नाही, त्याला फाशी द्या. माझ्‍या मते तो चांगला मुलगा आहे. तो दिल्लीत आहे हे मला माहीत नव्हते. कॉलेजच्या काळात तो विद्यार्थी नेता होता, पण तो कोणत्या विचारसरणीकडे झुकलेला आहे हे मला माहीत नाही. (Security Breach In Parliament)

मनोरंजनने बंगळुरू येथील एका आयटी कंपनीत काम केले आहे. तो अनेकदा दिल्ली आणि बंगळुरूलाही जात असे. त्याला वाचनाची आवड आहे. स्वामी विवेकानंदांचे लेखन त्‍याला आवडते. खासदार प्रताप सिम्हा ( त्‍यांनी दिलेल्‍या पासवर तरुणांना गॅलरीत प्रवेश मिळाला होता) आणि मनोरंजन यांचे चांगले संबंध आहेत, अशीही माहिती त्‍याच्‍या वडिलांनी दिली.

Parliament security breach :  अमोल शिंदेला लष्‍करात भरती व्‍हायचं होतं….

संसदेत घुसखोरी प्रकरणात चाकूर तालुक्यातील झरी (बु.) च्या अमोल शिंदेचा सहभाग असल्‍याची माहिती मिळताच लातूर जिल्‍ह्यात एकच खळबळ माजली. पोलिसांची पथके त्‍याच्‍या घरी पाेहचले . अमोलच्या आई-वडिलांना आपल्या मुलाने असे काही केल्याची माहिती  नव्हती. अमाेलला लष्‍करात भरती व्हायचं होतं. भरतीसाठी म्हणून दिल्लीला जातो, असे सांगून तो चार दिवासाआधी घरातून गेला हाेता, अशी माहिती त्‍यांनी दिली.  (Parliament Security Breach)

रोजंदारी कामगार आणि रिक्षा चालक  सागर शर्मा

संसदेत घुसखोरी करणारा सागर शर्मा हा आरोपी लखनऊमधील आलमबागमधील रामनगर भागातील रहिवासी आहे. तो काही दिवसांपूर्वी रोजंदारी कामगार म्‍हणून काम करत असे. अलिकडे तो ई-रिक्षा चालवायचा.संसदेतील घुसखोरीच्‍या प्रकारानंतर काही तासांनी दिल्ली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीच्‍याआधारे लखनौ पोलिसांनी त्याच्या घरी पोहोचून चौकशी सुरू केली. सागर हा मूळचा उन्नाव जिल्‍ह्यातील सोहरामाऊ गावचा रहिवासी आहे. गेल्‍या दोन वर्षांपासून तो बंगळुरूमध्ये राहत होता. सागर बारावी पास आहे. तो कटात सामील झाल्याचा संशय आहे. त्‍याची आई राणी शर्मा यांनी सांगितले की, सागरचे वडील रोशनलाल शर्मा हे सुतार काम करतात. सागरला आणखी एक भाउ आहे. आपण एका आंदोलनात सहभागी होणार असल्‍याचे सांगून सागर रविवारी घरातून निघून गेला होता, अशी माहिती त्‍याच्‍या आई-वडिलांनी दिल्‍ली पोलिसांना दिली. सागर बंगळुरूमध्ये काय करत होता माहिती नसल्‍याचेही त्‍यांनी पोलिसांना सांगितले.

संशयित आरोपी ललितचा शोध सुरु

संसद घुसखोरी प्रकरणातील पाचवा आरोप ललित हा फरार आहे. पोलिसांकडे त्‍याच्‍याबाबत विशेष माहिती नाही. तोही हरियाणाचा रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मात्र, तो मूळचा बिहारचा असल्याचाही संशय व्‍यक्‍त होत आहे.

आरोपींचे 'गुरुग्राम कनेक्‍शन'ही आले समोर

या प्रकरणातील आराेपींचे  गुरुग्राम कनेक्‍शन समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी विकी शर्माचे लंडनमध्‍ये राहणार्‍या एका कुटुंबाशीही संबंधही संबंध असल्‍याचे उघड झाले आहे. पोलिस तपासात समोर आलेल्‍या माहितीनुसार, संसदेतील घुसखोरी प्रकरणाती सागर शर्मा याचा गुरुग्राममधील सेक्टर-७ मधील हाऊसिंग बोर्ड कॉलनीतील घर क्रमांक ६७ मध्‍ये राहत असलेल्‍या विकी शर्माच्या घरी मुक्काम होता. विक्कीच्या घरात आरोपींच्या पिशव्या सापडल्या. आरोपींनी त्यांची बॅग तिथेच ठेवली आहे. सागर शर्मा आणि विकी शर्मा यांच्यातील संबंध समोर आल्यानंतर दिल्ली पोलिसांनी विकीला चौकशीसाठी सोबत घेतले आहे. विकीचे लंडनमध्ये राहणाऱ्या एका कुटुंबाशीही संबंध आहेत. विकीचे कुटुंब ज्या घरामध्ये राहते त्या घराचे मालक लंडनमध्ये राहतात. घरमालकही त्याच्या खात्यात पैसे जमा करतो. घरमालकाकडून मिळालेले पैसे हे विकीचे उत्पन्नाचे साधन असल्‍याचेही पोलीस तपासात उघड झाले आहे. शेजाऱ्यांनी माध्‍यमांनादिलेल्‍या माहितीनुसार, विकी याला ड्रग्जचे व्‍यसन आहे. अंमली पदार्थांच्या व्यसनामुळे त्याचे शेजारी राहणाऱ्या लोकांशी संबंध चांगले नाहीत. लोक म्हणतात की दर तिसर्‍या दिवशी पती-पत्नीमध्ये वाद होत असल्‍याची माहितीही समोर आली आहे.

हेही वाचा  :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT