Latest

Pakistani Actress : ‘शुक्रवारी पाकिस्तानचं जिंकतो’; ऑस्ट्रेलियाने धुळ चारताच पाकिस्तानी अभिनेत्री ट्रोल

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकिस्तानची सुप्रसिद्ध अभिनेत्री सेहर शिनवारी सध्या तिच्या विश्वचषक स्पर्धेतील दाव्यांमुळे चर्चेत आहे. सेहर शिनवारी पाकिस्तानी संघ विजय मिळवेल, अशी अपेक्षा करत सात्याने आशावादी दावे करत असते. शिवाय ती दावेच करत नाही तर ऑनलाईन आश्वासनेही देते. त्यामुळे तिला सातत्याने ट्रोलिंगला सामोर जावे लागत आहे. बांगलादेशने भारताचा पराभव केल्यास बांगली मुलाबरोबर डेटवर जाणार, असे आश्वासनही तिने दिले होते. मात्र, भारताने बांगलादेशचा पराभव करताच तिला प्रचंड ट्रोल करण्यात आले.

पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया हा सामना २० ऑक्टोंबर रोजी खेळवण्यात आला. तत्पूर्वी अभिनेत्री शिनवारी हिने पाकिस्तान शुक्रवारी कधीही सामना गमावत नाही, असा दावा केला. माझे ट्वीट लक्षात ठेवा, असे म्हटले होते. दरम्यान कांगारुंनी पाकिस्तानचा धुव्वा उडवत गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर उडी घेतली. त्यामुळे अभिनेत्री शिनवारीला नेटकऱ्यांनी प्रचंड ट्रोल केले आहे.

यानंतर शिनवारीने चिन्नास्वामी स्टेडियमवरील पाकिस्तानी संघाच्या कामगिरीवर उघडपणे जोरदार टीका केली. यानंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वरील तिच्या पोस्टला नापसंती व्यक्त केली जात आहे. तिच्या विरोधाभासी पोस्टचे स्क्रीनशॉट लवकरच व्हायरल होऊ लागले आहेत. शिवाय अनेक लोक तिला ट्रोल करत आहेत.

हेही वाचलंत का?

SCROLL FOR NEXT