Nitin Gadkari : देशभरात रस्ते बांधले, पण माझ्या घरासमोरचा रस्ता करताना…: गडकरी यांची खंत

Nitin Gadkari : देशभरात रस्ते बांधले, पण माझ्या घरासमोरचा रस्ता करताना…: गडकरी यांची खंत

नागपूर: पुढारी वृत्तसेवा : कुठलेही विकासाचे काम सुरू होत नाही, तोच लोक वकिलांच्या मदतीने कोर्टात जातात आणि प्रकल्पांवर स्थगिती मिळवून घेतात. मी देशभरात रस्ते बांधले पण माझ्या घरासमोरचा 2 किलोमीटर रस्ता बांधायला अनंत अडचणी आल्या अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विकासकामांत खोडा घालणाऱ्यांवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. नागपुरात आयोजित 'मनातले गडकरी' या कार्यक्रमात ते बोलत होते. अभिनेता प्रशांत दामले यांनी गडकरी यांची मुलाखत घेतली. Nitin Gadkari

महालातील दोन किलोमीटरचा रस्ता बांधण्यासाठी इतक्या न्यायालयीन प्रक्रिया, स्टे ऑर्डर आदींना तोंड द्यावे लागले की १३ वर्षांपासून हा रस्ता आजही झालेला नाही. 'मी देशभरात रस्ते बांधतो, पण माझ्याच घरासमोरचा रस्ता मी बांधू शकलो नाही', अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. Nitin Gadkari

विकासाचे कोणतेही काम सुरू झालं की स्टे आणा ही मानसिकता रुजली आहे. लोक नकारात्मक याचिका न्यायालयात दाखल करतात. नागपूरला १ हजार २०० कोटी रुपयांचे मल्टिमॉडेल स्टेशन बनवायचे होते. परंतु, लोक कोर्टात गेले आणि हा महत्वाकांक्षी प्रकल्प अडचणीत सापडला. देशातील सर्वांत मोठे प्रकल्प विदर्भात आणि त्यातल्या त्यात नागपुरात आणण्याचा माझा प्रयत्न असतो, पण कोर्टकचेऱ्या आड येतात, याकडे गडकरी यांनी लक्ष वेधले.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news