Ambadas Danve : पुन्हा एकदा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होवू देत: दानवे यांचे तुळजाभवानीला साकडे

Ambadas Danve : पुन्हा एकदा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होवू देत: दानवे यांचे तुळजाभवानीला साकडे
Published on
Updated on

तुळजापूर, पुढारी वृत्तसेवा : बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्या गद्दार राक्षसांचा बिमोड करून पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे सरकार येऊ द्या, असे साकडे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी तुळजाभवानी देवीला घातले. तत्पूर्वी मंदिर संस्थांच्या वतीने उपजिल्हाधिकारी योगेश खरमाटे व तहसीलदार सोमनाथ माळी यांच्या हस्ते त्यांचा संस्थानच्या वतीने सत्कार करण्यात आला. Ambadas Danve

दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावरच सर्व महाराष्ट्रातील जनतेचा विश्वास आहे. गद्दारांना निश्चित जनता घरी पाठवेल, असा विश्वास व्यक्त करून मुख्यमंत्री पदावर पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना विराजमान करण्यासाठी आम्हाला शक्ती दे, असे साकडे तुळजाभवनी चरणी घातल्याचे दानवे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. Ambadas Danve

यावेळेस शिवसेना महिला जिल्हाप्रमुख शामलताई वडणे, सोलापूर महिला जिल्हाप्रमुख अस्मिताताई गायकवाड, पंढरपूर महिला जिल्हाप्रमुख पूनमताई अभगराव, लातूर जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी, धाराशिव जिल्हाप्रमुख रणजित पाटील, युवासेना सचिव अक्षय ढोबळे, माजी उपजिल्हाप्रमुख शाम पवार, युवासेना तालुका प्रमुख प्रतीक रोचकरी, सोशल मीडिया तालुकाप्रमुख चेतन बंडगर, उपतालुकाप्रमुख सुनील जाधव, उपशहरप्रमुख बाळासाहेब शिंदे, युवा सेना शहरप्रमुख सागर इंगळे, विद्यार्थी सेना उपजिल्हाप्रमुख विकास भोसले आदी शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते. महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख शामलताई पवार यांनी दानवे यांना कवड्याची माळ घातली.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news