Chandrasekhar Bawankule: ‘मविआ’च्या नौटंकीबाज नेत्यांना जनताच धडा शिकविणार: चंद्रशेखर बावनकुळे

Chandrasekhar Bawankule: ‘मविआ’च्या नौटंकीबाज नेत्यांना जनताच धडा शिकविणार: चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर, पुढारी वृत्तसेवा: महाविकास आघाडीतील नेते आपल्या कामाच्या भरवशावर निवडून येऊ शकत नसल्यानेच उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले व इतर नेते जनतेत संभ्रम पसरविण्याचे, आम्हाला डॅमेज करण्याचे काम करतात. तो प्रयत्न हाणून पाडण्यासाठी आजचे आंदोलन असून आता या नौटंकीबाज नेत्यांना जनताच धडा शिकविणार, असा इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला. कंत्राटी भरतीचा निर्णय मविआच्या काळात उद्धव ठाकरेंनी घेतला होता, तो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महायुती सरकारने बदलवून बेरोजगार युवकांना न्याय दिला आहे. (Chandrasekhar Bawankule)

महाविकास आघाडीने कंत्राटी भरतीचे महापाप केल्याने मविआ नेत्यांनी माफी मागावी, असे आवाहन करीत काल राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार स्थानिक व्हेरायटी चौकात भाजपा कार्यकर्त्यांनी तीव्र आंदोलन केले. यावेळी संतप्त महिला कार्यकर्त्यांनी मविआ नेत्यांच्या पोस्टरला जोडे-चपला हाणून निषेध केला. आंदोलनानंतर बावनकुळे म्हणाले, राज्यभरातून आज पाच लाखांवर कार्यकर्ते रस्त्यावर आले.कंत्राटी भरती रद्द केल्याबद्दल युवकांच्यावतीने महायुती सरकारचे अभिनंदन करीत महाविकास आघाडीचे नेते खोटारडेपणा करीत असून देवेंद्र फडणवीस किंवा महायुतीचे सरकार कधीही खोटे काम करणार नाहीत, असा दावा केला. (Chandrasekhar Bawankule)

या आंदोलनात भाजपा प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे, धर्मपाल मेश्राम, आमदार समीर मेघे, शहराध्यक्ष बंटी कुकडे, ग्रामीण भाजपा जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे, डॉ. राजीव पोतदार, माजी आमदार मिलिंद माने, अर्चना डेहनकर, संध्या गोतमारे, नंदा जिचकार, वैशाली चोपडे, अनिल निधान, संदीप गवई, विलास त्रिवेदी, विष्णू चांगदे, राम आंबुलकर, रिकेश चवरे, आदर्श पटले, दिनेश ठाकरे, आशिष फुटाने यांच्यासह मोठ्या संख्येने भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news