Latest

ICC Champions Trophy : पाकिस्तानला ‘आयसीसी’कडून हवी नुकसान भरपाईची हमी

Shambhuraj Pachindre

कराची; वृत्तसंस्था : आशिया चषक 2023 स्पर्धेचा तिढा सुटला असे वाटत असताना पाकिस्तान पुन्हा रडायला लागले आहेत. 'आयसीसी'ची 2025 चॅम्पियन्स ट्रॉफीही पाकिस्तानात होणार आहे आणि त्याचे यजमानपद न भूषविण्याची धमकी आता 'पीसीबी'कडून दिली जाते आहे. भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी एकतर पाकिस्तानात येण्याची हमी द्यावी किंवा 'आयसीसी'ने होणार्‍या नुकसानीची आर्थिक हमी द्यावी, अशी मागणी 'पीसीबी'ने केली आहे. आशिया चषक 2023 प्रमाणे चॅम्पियन्स ट्रॉफीही (2025) हायब्रीड मॉडेलनुसार खेळवाली लागेल, ही भीती पाकिस्तानला सतावत आहे. (ICC Champions Trophy)

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ पाकिस्तानात न आल्यास होणार्‍या आर्थिक नुकसानाची हमी त्यांना 'आयसीसी'कडून हवी आहे. भारत सरकारच्या परवानगीशिवाय संघाला न पाठवण्यावर बीसीसीआय ठाम आहे. त्यामुळे 2025 मध्येही टीम इंडिया जाण्याची शक्यता नाही. त्यामुळे पीसीबी आतापासून 'आयसीसी'वर दबाव टाकण्यास सुरुवात करू लागले आहेत. 'आयसीसी'चे चेअरमन ग्रेग बार्क्ले आणि सीईओ जॉफ अलार्डिस यांनी मागील महिन्यात यजमानपदाच्या करारासाठी पाकिस्तान दौरा केला, परंतु, 'पीसीबी'ने त्यावर स्वाक्षरी करण्यास मनाई केली. आशिया चषकाचेही यजमानपद पाकिस्तानकडे आहे; परंतु 'बीसीसीआय'च्या विरोधामुळे त्यांना केवळ चार सामन्यांचे यजमानपद मिळाले आहे, तर 9 सामने श्रीलंकेत खेळवले जाणार आहेत. (ICC Champions Trophy)

हेही वाचा;

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT